“एचवायटी’तर्फे वारकऱ्यांना बिस्कीटांचे पुडे वाटप

पिंपरी : एचवायटी इंजिनअरिंग कंपनी इंटरर्नल कॉन्ट्रॅक्‍ट सिस्टिमतर्फे तुकोबांच्या पालखीचे स्वागत करून बिस्किट पुडे वाटप करण्यात आले.

पिंपरी, (प्रतिनिधी) – एचवायटी इंजिनिअरिंग कंपनी इंटर्नल कॉन्ट्रक्‍ट सिस्टिमतर्फे जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना बिस्कीटांचे पुडे वाटप करण्यात आले. यावेळी सुमारे तीन हजार वारकऱ्यांना त्याचे वाटप करण्यात आले.

तसेच, संत भगवानबाबा ज्ञानेश्‍वरी प्रासादिक दिंडीचे प्रमुख हभप अर्जुन महाराज खाडे यांच्या समूहास साऊंड सिस्टीम देण्यात आली. संत सोपानकाका महाराज पालखी यांना भोजनास 5 हजार रुपयांची देणगी देण्यात आली. चंद्रकांत सहाणे, नितीन, साबळे, अनिल कळसे, बापू पाटील, शंकर चौरघे, व कॉन्ट्रक्‍ट सिस्टिमच्या सहकाऱ्यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)