“एचबीओटी’ केंद्र खासगीकरण लांबणीवर!

पिंपरी- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालया (वायसीएम) मधील मल्टिीप्लेस हायड्रोलिंक ऑक्‍सिजन चेंबर विथ एअर लॉक सिस्टिम’साठी (एचबीओटी) केंद्र खासगी तत्वावर चालविण्याचा प्रस्तावाला विरोधी नगरसेवकांनी आक्षेप घेतला. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी सदर विषय मंजूर न करता तहकूब केला.

पालिकेची सर्वसाधारण सभा बुधवारी (दि.31) पार पडली. सभेत वायसीएम रूग्णालयातील सदर केंद्र खासगी तत्वावर चालविण्याचा प्रशासनाचा प्रस्ताव होता. त्यावर आक्षेप घेताना राष्ट्रवादीच्या सुलक्षणा धर म्हणाल्या की, वायसीएमध्ये गोर-गरीबांना मोफत वैद्यकीय उपचार करण्याऐवजी वैद्यकीय अधिकारी साहित्य खरेदीवर भर देत आहेत. महापालिकेकडे प्रशिक्षित मनुष्यबळ नसताना असे प्रकार केले जात आहेत. हा प्रकार केवळ ठेकेदाराना पोसण्यासाठी केल जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
नीता पाडाळे म्हणाल्या की, वायसीएममध्ये तोंड बघून उपचार केले जातात. ठराविक नगरसेवकांच्या फोनवर तत्काळ कारवाई केली जाते. राष्ट्रवादीच्या अनुराधा गोफणे म्हणाल्या की, वायसीएममधील एमआरआय’ व सीटी स्कॅन विभागातील डॉक्‍टर व कर्मचारी रूग्णांशी नीट बोलत नाहीत. वायसीएममध्ये रेबीज उपलब्ध नाही. यावर स्थानिक नगरसेविका असलेल्या शिलवंत-धर यांच्या मागणीचा विचार करण्याची मागणी मनसेचे गटनेते सचिन चिखले यांनी केली. मात्र, त्यांचे विरोधी पक्षनेते सक्षम आहेत. तुम्ही तुमचे मत मांडा, असे महापौरांनी सुनावताच सभागृहात एकच हशा पिकला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

काही नगरसेवक विषयपत्रिका व डॉकेटचा अभ्यास व पूर्वतयारी न करता सभागृहात बोलतात. त्यामुळे सभागृहाचा महत्वाचा वेळ वाया जातो. त्यामुळे मुख्य विषयांवर अन्याय होतो असे भाजपच्या आशा शेंडगे म्हणाल्या. वायसीएममध्ये गरीब रूग्णांना सदर सुविधांसाठी अल्प दर आकारावा, अशी सूचना त्यांनी यावेळी केली.

शिवसेना गटनेते राहुल कलाटे म्हणाले की, ही मशिन खरेदी करून ठेवले आहे. त्याचा वापर न झाल्याने महापालिकेने नुकसान झाले आहे. मात्र. ही मशिन वापराचे धोरण ठरविण्याची मागणी केली. विरोधी पक्षनेते दत्ता साने टीका करताना म्हणाले की, ही मशिन आठ वर्षांपासून वापराअभावी पडून आहे. मशिन व रूग्णालयाची जागा खासगी संस्थेला त्यांना पोसण्याचा हा प्रकार आहे. या विषयाला राष्ट्रवादीचा विरोध आहे. डॉ. के. अनिल रॉय व डॉ. पवन साळवे यांच्या वादामुळे वायसीएम रूग्णालयाची वाट लागली आहे, असा आरोप त्यांनी केला.

मनुष्यबळ नसल्याने खासगीकरणाचा प्रस्ताव…
एचबीओटी मशिन 2012 ला 2 कोटी 79 लाख रूपयांत मनाली एंटरप्रायजेसकडून खरेदीत केले असून, ते 2013ला वायसीएममध्ये बसविण्यात आले. या खरेदीवरून भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याने चौकशी समिती नियुक्त केली होती. पुण्याचा सीओईपीकडून यंत्राची किंमत तपासून घेण्यात आली. 2014 ला मशिन 2 महिने चालले व बंद पडले. मशिन दुरूस्तीसाठी मनाली एंटरप्रायजेसने नकार दिला. सदर मशिन देखभाल व नियंत्रणासाठी खासगी संस्थेला देण्याचा निविदा काढली आहे. त्यास दोन संस्थांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. रूग्णालयात मनुष्यबळ नसल्याने व सदर बेसमेंटमधील जागेचा वापर इतर कारणासाठी होऊ शकत नाही, असे डॉ. रॉय यांनी खुलासा करताना सांगितले.

“वायसीएम’मध्ये डॉक्‍टरांची संख्या वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहे. तालेरा रूग्णालय सुरू आहे. एका विशिष्ट ठेकेदाराला डोळ्यासमोर ठेऊन प्रशासनाने विषय आणू नयेत. महापौरांनी हा विषय तहकूब ठेवला.
– एकनाथ पवार, सत्तारुढ पक्षनेते, महापालिका.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)