एचपीसीएल भांडवली गुंतवणुकीत वाढ करणार

मुंबई: आपल्या व्यवसायाची वाढ आणि विस्तार करण्यासाठी हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. एचपीसीएल ही सरकारी मालकीची कंपनी पुढील पाच वर्षात 75 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करेल, असे कंपनीचे प्रमुख एम. के. सुराना यांनी समभागधारकांना सांगितले.
स्वयंपूर्ण होण्यासाठी तेलशुद्धीकरण प्रकल्पाचा विस्तार करण्याची योजना आहे. पेट्रोकेमिकल्समध्ये नफा वाढविण्यासाठी विविध क्षेत्रात गुंतवणूक करण्यात येणार आहे. नवीन क्षेत्रात व्यवसायाचा विस्तार करण्यात येत आहे आणि भविष्यासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या नैसर्गिक वायू क्षेत्रात विस्तार करण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. एचपीसीएलने आंध्र प्रदेशातील तेलशुद्धीकरण प्रकल्पात 20,928 कोटी आणि मुंबईतील प्रकल्पात 5,060 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)