एचडीएफसी व गॅंलाघर संघांचे चमकदार विजय

पुणे – एचडीएफसी संघाने ऍमडॉक्‍स संघाचा तर गॅंलाघर संघाने टाटा टेक्‍नॉलॉजी संघाचा पराभव करताना क्‍लिक ऑन क्रिकेट कॉर्पोरेट क्रिकेट अजिंक्‍यपद 2017 स्पर्धेत आगेकूच केली. सत्यम व्हॅकेशन यांच्यातर्फे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

पूना क्‍लब व व्हिजन क्रिकेट अकादमी मैदान येथे सुरू असलेल्या या स्पर्धेतील साखळी फेरीत सुधाकर भोसलेच्या 42 धावांच्या जोरावर एचडीएफसी संघाने ऍमडॉक्‍स संघाचा 4 गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा खेळताना रोहित लालवानीच्या 50 धावांच्या बळावर ऍमडॉक्‍स संघाने 20 षटकात 9 बाद 156 धावा केल्या. 156 धावांचे लक्ष्य एचडीएफसी संघाने 17.3 षटकात 6 गडी गमावत 159 धावा करून पुर्ण केले. यात निर्मल हर्षेने 24, सागर जाधवने 20 व रोहित सोनावणेने 28 धावा करून सुधाकरला सुरेख साथ दिली. सुधाकर भोसले सामनावीर ठरला.
आज झालेल्या दुसऱ्या सामन्यात श्रीकांत सोमवंशीच्या 64 धावांच्या जोरावार गॅंलाघर संघाने 20 षटकात 6 बाद 213 धावा केल्या. यात सामी अरीफने अर्धशतकी खेळी करत श्रीकांतला सुरेख साथ दिली. 213 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राकेश वाल्मिकीची 89 धावांची तसेच स्वप्निल नानगलची 54 धावांची खेळी टाटा टेक्‍नॉलॉजी संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही.

अखेर टाटा टेक्‍नॉलॉजी संघ 1 षटक बाकी असतानाच 205 धावांसह सर्वबाद झाला. श्रीकांत सोमवंशी सामनावीर ठरला. सिद्धार्थ शर्माने 17 धावांत 2, तसेच गौरव बाजपेयीने 30 धावांत 3 बळी घेत गॅलाघरच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

सविस्तर निकाल – साखळी फेरी

ऍमडॉक्‍स- 20 षटकांत 9 बाद 156 धावा (रोहित लालवानी 50, भावनीश कोहली 25, मयंक गुप्ता 2-35, सुशील शेवाळे 2-20) पराभूत वि एचडीएफसी- 17.3 षटकांत 6 बाद 159 धावा (सुधाकर भोसले 42, निर्मल हर्षे 24, सागर जाधव 20, रोहित सोनावणे 28, सुशील शेवाळे 21, आदित्य वर्मा 2-20) सामनावीर- सुधाकर भोसले, एचडीएफसी संघाचा 4 गडी राखून विजय.

गॅंलाघर- 20 षटकांत 6 बाद 213 धावा (श्रीकांत सोमवंशी 64,सामी अरीफ 50, तेजस कवडे 48, संदिप पाटील 20, जितेंद्र भारती 2-30) वि.वि टाटा टेक्‍नॉलॉजी- 19 षटकांत सर्वबाद 205 धावा (राकेश वाल्मिकी 89, स्वप्निल नानगल 54, दीपक सावंत 24, सिद्धार्थ शर्मा 2-17, गौरव बाजपेयी 3-30) सामनावीर- श्रीकांत सोमवंशी, गॅंलाघर संघाचा 8 धावांनी विजय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)