एचडीएफसी बॅंकेच्या ठेवीवरील व्याजदरात वाढ 

नवी दिल्ली: एचडीएफसी बॅंकेने आपल्या विविध ठेवीवरील व्याजदरात 0.6 टक्‍क्‍यांपर्यंत वाढ केली आहे. गेल्या आठवड्यात रिझर्व्ह बॅंकेने आपल्या रेपो दरात पाव टक्‍क्‍याने वाढ केली होती. त्या अगोदर स्टेट बॅंकेनेही आपल्या ठेवीवरील व्याजदरात वाढ केली केली आहे. त्यामुळे आता बॅंका लवकरच कर्जावरील व्याजदरातही वाढ करण्याची शक्‍यता असल्याचे बोलले जाऊ लागले आहे.

एचडीएफसी बॅंकेने 6 महिने ते 5 वर्षापर्यंतच्या ठेवीवरील व्याजदरात वाढ केली असून ती सोमवारपासून लागू करण्यात आली आहे. दोन महिन्यात रिझर्व्ह बॅंकेने दोन वेळा व्याजदरात वाढ केल्यामुळे व्यावसायिक बॅंकांना त्यांच्या ठेवीवरील आणि कर्जावरील व्याजदरात वाढ करावी लागत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)