एचडीएफसीच्या नफ्यात मोठी वाढ

मुंबई -डिसेंबर 2017 या तिमाहीत हाऊसिंग डेव्हलपमेन्ट फायनान्स कॉर्पोरेशनच्या नफ्यात 233 टक्क्‌यांनी वाढ नोंदविण्यात आली. तिसऱया तिमाहीत कंपनीचा नफा 5,670 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

गेल्या वर्षी समान कालावधीत हा 1707 कोटी रुपये होता. एचडीएफसी स्टॅडर्ड लाईफ इन्शुरन्सच्या विक्रीमुळे नफा 3675 कोटी रुपयांवर पोहोचला. कंपनीच्या उत्पन्नात 6.55 टक्क्‌यांनी वाढ होत 8,667 कोटी रुपयांवर पोहोचला. व्याजातून मिळालेले उत्पन्न 11.2 टक्क्‌यांनी वाढत 2967 कोटी रुपयांवर पोहोचले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)