एचआयव्ही रोखण्याचे आव्हान अद्याप कायम

-जिल्ह्यात साडे आठ हजार व्यक्तींना औषधोपचार
-चौदा एआरटी सेंटरमध्ये सुविधा

सातारा – तब्बल 16 वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर एचआयव्ही संसर्गाचे प्रमाण करण्यामध्ये यश मिळाले असले तरी अद्याप पूर्णपणे संसर्ग दूर करता येवू शकलेला नाही. सातारा जिल्ह्यात ही एचआयव्ही संसर्गाचे प्रमाण प्रत्येक वर्षी घटत आहे. मात्र, दरवर्षी नव्याने संसर्ग होणाऱ्या व्यक्तींची संख्या आढळून येत आहे. सन.2018 मध्ये 1 लाख 15 हजार 437 व्यक्तींची तपासणी करण्यात आली असून त्यामध्ये 789 एचआयव्ही संसर्गित आढळून आले . तर जिल्ह्यात 8 हजार 580 व्यक्ती औषधोपचार घेत आहेत.

एडस्‌ विषयी जनजागृती व्हावी यासाठी 1 डिसेंबर हा जागतिक एडस्‌ दिन म्हणून घोषित करण्यात आला आहे. या निमित्ताने सातारा जिल्ह्यातील एडस्‌ विषयक सद्यस्थितीचा आढावा घेतला असता एचआयव्ही संसर्गाच प्रमाण कमी करण्यात यश येत असले तरी संसर्ग पूर्णपणे दूर करण्यामध्ये यश मिळू शकेलेले नाही. सातारा जिल्ह्यात एडस्‌ नियंत्रण कक्षाची स्थापना झाल्यापासून सुरूवातीच्या सन.2004 मध्ये 549, सन.2005 मध्ये 840, सन.2006 मध्ये 691, सन.2007 मध्ये 1 हजार 800, सन.2008 मध्ये 2 हजार 180, सन.2009 मध्ये 1 हजार 955, सन.2010 मध्ये 1 हजार 1 हजार 772, सन. 2011 मध्ये 1 हजार 874, सन.2012 मध्ये 1 हजार 678, सन. 2013 मध्ये 1 हजार 527, सन.2014 मध्ये 1 हजार 202, सन.2015 मध्ये 1 हजार 85, सन.2016 मध्ये 923, सन. 2017 मध्ये 957 तर सन.2018 मध्ये अत्तापर्यंत 813 संसर्गित व्यक्ती आढळून आले आहेत. यापैकी 8 हजार 580 व्यक्तींना जिल्ह्यातील 14 एआरटी सेंटरमध्ये औषधोउपचार देण्यात येत आहेत तर 571 व्यक्ती खासगी रूग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत.

युवकांसह गर्भवती मातांमध्ये जनजागृती
जिल्हा एडस नियंत्रण विभागाच्यावतीने जनजागृती करण्याबरोबर तपासणी करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे. मागील वर्षी जिल्ह्यात तब्बल 10 हजार महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनी तपासणी करण्यासाठी पुढाकार घेतला तर यावर्षी देखील तपासणी करण्यासाठी युवक वर्ग स्वत:हून पुढे येत आहे. त्याचबरोबर गर्भवती मातांची सुरूवातीच्या महिन्यांमध्येच शासकीय व खासगी रूग्णालयांमध्ये तपासणी करण्यात येत असून त्यामुळे भविष्यात जन्माला येणाऱ्या बाळाच्या जिवीताचे रक्षण करता येत आहे.

एआरटीची गोळी, आयुष्याची दोर बळकट करी
सातारा जिल्ह्यात एचआयव्ही तपासणी 22 आयसीटीसी केंद्रे, 71 प्राथमिक आरोग्य केंद्र, 400 प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये मोफत तर 105 रूग्णालयांमध्ये कमी दरामध्ये उपलब्ध आहे. तपासणी नंतर ससंर्गित आढळून ओलल्या व्यक्तींना उपचार घेण्यासाठी 14 ठीकाणी सरकारच्यावतीने सेंटर्स स्थापन करण्यात आली आहेत. त्यापैकी सातारा, कराड व फलटण हे मुख्य तथा नोडल एआरटी सेंटर्स आहेत. तर उंडाळे, पाटण, ढेबेवाडी, वडूज, दहिवडी, गोंदवले, खंडाळा, वाई, महाबळेश्‍वर, मेढा व कोरेगाव येथे लिंक एआरटी सेंटर्स उभारण्यात आले आहेत. त्याठीकाणी सहजपणे उपचार घेता येणार असून संसर्गित व्यक्तीने केवळ रोज एआरटीची गोळी घेतल्यास त्यास आयुष्यभर कोणताही धोका उद्भवत नाही
– हेंमत भोसले (जिल्हा कार्यक्रम अधिकारी )


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)