“एचआयव्ही’ बाधितांसाठी “एआरटी’ ठरतेय नवसंजीवनी

प्रशांत घाडगे

पिंपरी – महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील (वायसीएमएच) ए.आर.टी सेंटर एचआयव्ही बाधित रुग्णांसाठी नव संजीवनी देणारे ठरत आहे. या आजाराने बाधित असणाऱ्या रुग्णांना प्रामुख्याने मानसिक आधाराची गरज असून या सेंटरमध्ये रुग्णांच्या आरोग्याची काळजी उत्तमरित्या घेतली जात आहे. यंदाच्या वर्षी “नो युव्हर एचआयव्ही स्टेटस्‌’ हे घोषवाक्‍य सेंटरचे आहे.

वायसीएम रुग्णालयातील ए.आर.टी सेंटरची सुरुवात 2008 साली झाली असून 2018 नोव्हेंबरअखेर सोळा आजार रुग्णांची नोंदणी करुन त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. एचआयव्ही बाधित रुग्णांना नियमित उपचाराची गरज असते. वायसीएम रुग्णालयात असणारे सेंटर रुग्णांसाठी जीवनदायी ठरत आहे. या रुग्णांना काळजी, आधार आणि उपचार (केअर) या त्रिसूत्रीची गरज असते. याच सूत्रानुसार या रुग्णालयात उपचार केले जातात. ए.आर.टी सेंटरमध्ये महिन्याला सरासरी सहा हजार तर दिवसाला दोनशेहून अधिक रुग्णांची तपासणी केली जाते. तसेच, जे रुग्ण बाधित आढळतात त्यांना योग्य सल्ला देऊन नियमित उपचार केले जातात. तसेच, एचआयव्ही या आजारावर प्रभावीपणे काम केल्याबद्दल वायसीएमच्या ए.आर.टी सेंटरला दोन वेळस राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आलेले आहे.

एड्‌स या आजाराविषयी नागरिकांमध्ये जनजागृती करण्याची आवश्‍यकता आहे. रुग्णांना योग्य समुपदेशनाची गरज असते. देशातून 2030 सालापर्यत एच.आय.व्ही हा आजार हद्दपार करण्याचे धोरण केंद्र सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या एच.आय.व्ही आजारावर काम करणाऱ्या विविध राष्ट्रीय संघटनांचे आहे. तसेच, या आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांना समुपदेशन, मार्गदर्शन, योग्य आहार व औषधांचे सातत्य याबाबत मार्गदर्शनाची गरज असते. तसेच, एचआयव्ही रुग्णांनी व्यसनाधिनता टाळणे, विवाह्यबाह्य संबंध टाळणे, नियमित उपचार ठेवल्यास रुग्ण उत्तमरित्या जगू शकतो.

ए.आर.टी. सेंटरमध्ये अद्यापपर्यत नोंदणी केलेले रुग्ण
2008 – 1380
2009 – 1622
2010 – 1659
2011 – 1614
2012 – 2317
2013 – 1774
2014 – 1407
2015 – 1081
2016 – 1267
2017 – 1019
2018 – 851 (नोव्हेंबर अखेर)


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)