एचआयव्हीबाधित अनाथ बालकांना शालेय साहित्य वाटप व वृक्षारोपण कार्यक्रम

सातारा – जिल्हा रुग्णालयातील ए. आर. टी. विभागात अनेक अनाथ लहान बालके व शालेय विद्यार्थी उपचार घेत आहेत या अनाथ बालकांची जबाबदारी ए. आर. टी. विभागातील सर्व कर्मचारी स्विकारत आहेत. अनेक वर्षे शालेय साहित्य, कानटोपी, स्वेटर, स्लीपर व पौष्टिक आहार याचे स्वखर्चाने वाटप करत आहे. विभागाचे अधिकारी डॉ. सुधीर बक्षी यांनी ए. आर. टी. विभागातील सर्व कर्मचारी यांची बैठक घेऊन या अनाथ बालकांना नवीन शैक्षणिक वर्षात अतिशय चांगले, नीट नेटके संपूर्ण शालेय साहित्य आणि पाणी पिण्याची बाटली पुरवण्याचे ठरवले.

सदर कार्यक्रमासाठी मा. नगराध्यक्षा माधवी कदम व या प्रभागाच्या नगरसेविका श्रीमती जेधे मॅडम व लागीर झालं जी फेम जयडी कु. किरण ढाणे या उपस्थित होत्या. या कार्यक्रमाची अत्यंत भावनिक प्रस्तावना नोडल अधिकारी यांनी केली व या एड्‌सग्रस्त अनाथ बालकांची दाहकता समजावून सांगितली हा कार्यक्रम आणि त्याची दाहकता लक्षात घेऊन मा. नगराध्यक्षा यांनी स्वतःकडचे रुपये 5000 त्याच वेळी कार्यक्रम चालू असताना स्वतःची वर्गणी म्हणून डॉ. सुधीर बक्षी यांच्याकडे सुपूर्द केली व तसेच या कार्यक्रमाला कधीही बंद करू नका व दरवर्षी माझ्याकडून वर्गणी घेण्यात यावी असे जाहीर केले.

-Ads-

या कार्यक्रमासाठी प्रभारी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माने, वैद्यकीय अधिकारी डॉ. संजोग कदम, तसेच जिल्हा शासकीय रुग्णालयातील सर्व विभागाचे विभागप्रमुख, प्रतिनिधी उपस्थित होते. तसेच एआरटी विभागाच्या प्रांगणामध्ये मा. नगराध्यक्षा, ”लागिर झालं जी” फेम किरण ढाणे (जयडी) यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम देखील संपन्न झाला. सदर कार्यक्रम हा आमचे नोडल अधिकारी डॉ. सुधीर बक्षी, एआरटी विभाग ह्यांच्या प्रेरणेतून हा कार्यक्रम पार पडला आणि नियोजनासाठी त्यांचे महत्वाचे मार्गदर्शन लाभले. हा कार्यक्रम ए. आर. टी. विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी व गुप्तरोग विभाग यांच्या सहकार्यातून पार पडला.

फोटो : जे 1 , जे 2 नावाने सेव्ह

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)