एखतपुर-मुंजवडी येथे स्वछता अभियान

खळद – जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या स्वच्छता पंधरवाड्यास एखतपूर-मुंजवडी ग्रामपंचायतीच्या वतीने सुरुवात करण्यात आली. या वेळी या भागाचे जिल्हा परिषदेचे सदस्य दत्ता झुरंगे,सरपंच लक्ष्मीताई धिवार, ग्रामपंचायत सदस्य राणीताई झुरंगे, दिपाली टिळेकर, अमोल टिळेकर, आशा गटप्रवर्तक सिमा झुरंगे, आशा ज्योती टिळेकर, अंगणवाडी सेविका शुभांगी खळदकर, जयश्री झुरंगे, उत्तम झुरंगे, काळुराम झुरंगे आणि सहभागी झाले होते. यावेळी ग्रामपंचायतीच्या सभोवतालचा परिसर,मंदिर परिसर,शाळेच्या परिसरातील स्वछता तसेच गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाकीचा व परिसर स्वच्छतेच्या कामात गावातील ग्रामस्थ महादेव टिळेकर ,बाळासाहेब झुरंगे,मुरलीधर ब. झुरंगे यांनी सहभाग घेऊन मदत केली ग्रामस्वच्छता अभियानाची ग्रामस्थांना माहिती देताना पोषण, आरोग्यसेवा, सार्वजनिक ठिकाणी, पाणीपुरवठा, शाळा व शासकीय इमारतीची स्वच्छता राखण्यावर भर देणार असल्याचे सरपंच लक्ष्मी धिवार यांनी सांगितले. कार्यक्रमाचे नियोजन या भागाच्या आरोग्य विभागाच्या आशा गट प्रवर्तक सीमा झुरंग यांनी केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)