एक हजार मेट्रो सेगमेंटचा टप्पा पूर्ण

पिंपरी – महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वतीने रेंजहिल्स ते चिंचवडच्या मदर टेरेसा उड्डाणपुलापर्यंतच्या रिच वनच्या (कॉरिडॉर) प्रकल्पासाठी 1 हजार सेगमेंटची निर्मिती नुकतीच करण्यात आली आहे. तर या सेगमेंटमधील एक हजाराव्या सेगमेंटचे पूजन महामेट्रोच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले.

सेगमेंटची निर्मिती करण्याचे काम नाशिक फाटा चौकातील दुमजली उड्डाणपुलाजवळील पिंपळे गुरव येथील कास्टींग यार्ड येथे सुरू आहे. सुमारे 400 किलोचे वजनाच्या कॉंक्रीट सेगमेंटची बांधणी अचूक आणि तंत्रशुद्धपणे केली जात आहे. प्रत्येक सेगमेंटला क्रमांक दिला असून, तो सेगमेंट संबंधित निश्‍चित केलेल्या जागीच बसविला जात आहे. त्यात कोणताही बदल केला जात नाही. अशी माहिती रिचवनचे मुख्य प्रकल्प व्यवस्थापक गौतम बिऱ्हाडे यांनी दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

रेंजहिल्स ते चिंचवडपर्यंतच्या सुमारे सव्वा बारा किलोमीटर अंतरासाठी एकूण 457 पिलर उभारले जाणार आहेत. त्यापैकी 182 पिलर उभे करण्यात आले आहेत. दोन पिलरमध्ये 10 सेगमेंटची जुळवणी करून एक स्पॅन (पुल) पूर्ण केला जातो. दोन पिलरमधील अंतर 25, 28 ते 30 मीटर असे आहे. या सव्वाबारा किलोमीटर मार्गासाठी एकूण 3 हजार 132 सेगमेंट तयार करण्यात येणार आहेत. त्यापैकी 1 हजार सेगमेंट निर्मितीचा टप्पा नुकताच पूर्ण करण्यात आला आहे.

या मार्गावर एकूण 53 स्पॅनची जुळवणी पूर्ण करण्यात आली आहे. हे 400 किलो वजनाचे सेगमेंट अवजड ट्रकवरून वाहतूक केली जात आहे. त्यामुळे हे काम शक्‍यतो रात्रीच्या वेळी वाहतूक रहदारी कमी झाल्यानंतर केले जात आहे. तसेच, वनाज ते रामवाडी मार्गासाठी सेगमेंट निर्मितीचे काम वाकड येथील कास्टींग यार्ड येथे सुरू आहे. तेथे आतापर्यंत एकूण 450 सेगमेंटची निर्मिती पूर्ण झाली आहे.

मेट्रो दृष्ट्रीक्षेपात
फाउंडेशन – 222
खांब – 181
खांबावर रॅंप- 100
सेगमेंट -1000
स्पॅन – 51

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)