एक हजार उद्योगांना फटका

पिंपरी – राज्य सरकारने प्लास्टिक व थर्माकोलवर घातलेल्या बंदीचा परिणाम काही दिवसातच मोठ्या प्रमाणावर दिसू लागला आहे. उद्योगनगरीतील किमान एक हजार उद्योगांना या बंदीच फटका बसला आहे व इतरही हजारो उद्योगांवर या बंदीचा थेट परिणाम होत आहे.

उद्योगनगरीमधील पंधरा हजार लहान-मोठ्या उद्योगांमध्ये प्लास्टिक उतादकांची संख्या सुमारे एक हजार इतकी आहे. या एक हजार उद्योगांमध्ये 50 हजार कामगार काम करत आहेत. तसेच इतरही सर्व उद्योगांना पॅकिंगसाठी प्लास्टिक व थर्माकोलला अद्याप पर्याय मिळाला नसल्याने बाकी उद्योगांवरही परिणाम होऊ लागला आहे.

या संदर्भात शहरातील पाच मुख्य औद्योगिक संघटनांची शिखर संस्था पिंपरी-चिंचवड एमएसएमई इंडस्ट्रीज असोसिएशन फोरमने देखील प्लास्टिक बंदी निर्णयाचा फेरविचार करण्याची पर्यावरण मंत्र्यांकडे मागणी केली आहे. उल्लेखनीय बाब अशी की राज्यात प्लास्टिक व थर्माकोल उत्पादन करणारे 15 हजार उद्योग आहेत, या क्षेत्रांमध्ये सुमारे चार लाख कामगार काम करतात. या निर्णयाचा फेरविचार होणे गरजेचे असल्याची मागणी उद्योग क्षेत्राकडून होत आहे.

उद्योगांवर परिणाम कसा?
पिंपरी-चिंचवड शहरात एक हजाराहून अधिक सूक्ष्म, लघु आणि मध्यम प्लास्टिक उद्योग आहेत. सरकारने घेतलेल्या निर्णयाबाबत अद्याप ही संभ्रमाचे वातावरण आहे. कोणत्या उत्पादनांवर बंदी घातली आहे आणि कोणते अपवाद आहेत, याबाबत उद्योजकांमध्ये संभ्रम आहे. उत्पादन करत असलेल्या 90 टक्‍क्‍यापेक्षा अधिक उत्पादनांवर बंदी आहे, उरलेल्या दहा टक्‍क्‍यांमध्ये उद्योग सुरु ठेवणे शक्‍य असल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे. दुसरीकडे इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तुंपासून ते उद्योग क्षेत्रात वापरले जाणारे नाजूक पार्टस थर्माकोलच्या सहाय्याने पॅक केले जातात. असे न केल्यास त्यांना आणि पर्यायाने उद्योजकांना मोठे नुकसान होण्याची शक्‍यता असते. दुसरीकडे काही पार्टस निश्‍चित केलेल्या आकाराप्रमाणेच बनवावे लागतात. त्याला जराजरी खरचटले आणि त्याच्या आकारात अंतर पडले तर तो पार्ट रिजेक्‍ट होण्याची शक्‍यता असते. अगदी एक मिमीचा फरक सुद्धा चालत नाही, असे पार्टस्‌ थर्माकोलमध्येच पॅक करुन पाठविले जातात. याशिवाय इतरही माल प्लास्टिक शिवाय पॅकिंग होणे सध्या तरी शक्‍य नाही. या निर्णयामुळे प्लास्टिक उत्पादन अथवा विक्री करत नसलेल्या उद्योगांनाही याचा फटका बसत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)