एक संवाद महानायकाशी…

अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिमीत्त एक डिजीटल आठवण

मुकुंद फडके
या सहस्त्रकाचा महानायक अशी पदवी मिळालेले सुपरस्टार शहेनशहा अमिताभ बच्चन यांचा आज वाढदिवस.आपल्या आगळ्यावेगळ्या आवाजाबद्दल प्रख्यात असलेल्या या महानायकाचा आवाज प्रत्यक्ष ऐकण्यासाठी अनेकजण आतुरलेले असतात.त्यामुळेच मला जेव्हा या महानायकाचा आवाज प्रत्यक्ष ऐकायला मिळाला तेव्हा आयुष्यात एक मोठी उपलब्धी मिळवल्याचा आनंद झाला होता.अर्थात त्याला निमीत्त होते कौन बनेगा करोडपती हा कार्यक्रम आणि या कार्यक्रमाच्या हॉटसीटवर बसलेल्या मित्राला मी फोन ए फ्रेंड म्हणून केलेली मदत.
त्याचे असे झाले,माझे जाहीरात विभागातील सहकारी सुरेंद्र नाईक निंबाळकर यांची कौन बनेगा करोडपती कार्यक्रमासाठी निवड झाली होती.फोन ए फ्रेंड या लाईफ लाईनसाठी त्यांनी माझी निवड केली होती.या कार्यक्रमाचे चित्रीकरण कधी होणार आहे याची कल्पना त्यांनी मला देउन ठेवली होती.मी वाट पहातच होतो.पण प्रत्यक्ष संवाद झाला ती परिस्थिती खूपच वेगळी होती.
दैनिकाच्या कामकाजानिमीत्त मी नेहमीप्रमाणे तेव्हा दौऱ्यावर होतो.सप्टेंबर महिन्याचा अखेरचा आठवडा होता.रात्रीची आठची वेळ.कोकणात पाउस होताच.कणकवलीकडून मी राजापूरकडे येत असतानाच मोटारीत काहीतरी बिघाड झाला.बॉनेट उघडून काहीतरी करण्याचा प्रयत्न सुरु असतानाच मोबाईल वाजला.सोनी टीव्हीवरुन एक मुलगी बोलत होती.तुमचे मित्र हॉट सिटवर बसले आहेत,तुमची गरज त्यांना लागू शकते.तरी तुम्ही फोन बंद करु नका किंवा रेंजच्या बाहेर जाउ नका अशा सूचना तिने दिल्या.वर पावसाचा आवाज,मुंबई गोवा महामार्गावरील वाहतुकीचा आवाज यामध्ये आपल्याला सोनी टीव्हीवरील संभाषण ऐकता येईल की नाही याची भिती मला वाटली.म्हणून गाडी तेथेच सोडून मी रस्त्याच्या आतील भागात असलेल्या एका दुकानाच्या आडोशाने उभा राहिलो.10 मिनीटांनी पुन्हा फोन वाजला.ती मुलगीच बोलत होती.तिने आणखी काही सूचना दिल्या.ती म्हणाली,कृपया आजच्या दिवसाविषयी किंवा पाउसपाण्याविषयी बच्चनसाहेबांशी काही बोलू नका.बच्चनसाहेबांच्या वाढदिवसाच्या एपिसोडचे चित्रीकरणही झाले आहे.त्यामुळे त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छाही देउ नका.थोड्याच वेळात तुमच्या मित्राला तुमची गरज लागेल अशी शक्‍यता आहे.
5 मिनीटांनी फोन वाजला आणि प्रत्यक्ष महानायकाचा आवाज कानावर पडला.
तेव्हा झालेले संभाषण असे होते.
महानायक:हॅलो मुकुंदजी मै अमिताभ बच्चन बोल रहा हू कौन बनेगा करोडपतीसे
मी:हॅलो सर हाउ आर यू सर
महानायक:मै अच्छा हू आप कैसे है
मी:सर आपसे बात करने के बात मै सुपर फाईन हो गया हू सर
महानायक:(हसत)आपके मित्र सुरेंद्रजी यहा हॉट सीटपर है.उनको मदत की जरुरत है.मै अप प्रश्‍न पढूंगा आप जबाब दिजीए
त्यानंतर नेहमीची प्रक्रिया पार पडली.15 सेकंद शिल्लक असतानाच मी उत्तर दिले आणि फोन बंद झला.पण महानायकाचा तो आवाज आजही कानात गुंजत राहिला आहे.त्यानंतर अनेकवेळा मी हा एपिसोड पाहिला आणि तो आवाज पुन्हा पुन्हा साठवून ठेवला.
माझ्या मदतीमुळे निंबाळकर यांनी 80000 रुपयावरुन 160000 पर्यत उडी मारली.
वाचकांच्या माहितीसाठी:निंबाळकर ज्या प्रश्‍नावर अडले होते ,तो प्रश्‍न होता:एजंट विनोद या चित्रपटात सैफ अली खान कोणत्या गुप्तहेर संस्थेजा एजंट आहे.या प्रश्‍नाचे बरोबर उत्तर होते रॉ .
आज अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिमीत्त पुन्हा एकदा या आठवणींना उजाळा मिळाला.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)