एक विचार न राहिल्याने भाजपचे पाच आमदार – पवार

 सरकार गंभीर नसल्याने सर्वसामान्यांची परवड
नगर – पुरोगामी आणि डाव्या विचारांचा जिल्हा म्हणून नगरची ओळख होती. तेव्हा भाजप नव्हता. परंतू जिल्ह्यात कॉंग्रेस असो वा राष्ट्रवादी एक विचाराने राहिली नाही. त्यामुळे जिल्ह्यात भाजपचे पाच आमदार निवडून आले. ही पुरोगामी जिल्ह्याच्या दृष्टीने दुदैवाची बाबत आहे. अजूनही एकच विचाराने काम करा, सर्वसामान्यांबरोबर राहुन त्यांना मदत करा, राष्ट्रवादीला गतवैभव प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथे केले.
एका कार्यक्रमाच्या निमित्ताने पवार नगरला आले असता राष्ट्रवादी भवन या पक्षाच्या कार्यालयात झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,पक्षाचे प्रभारी दिलीप वळसे, ज्येष्ठ नेते मधुकर पिचड, आमदार अरूण जगताप, आमदार वैभव पिचड, आमदार राहुल जगताप, आमदार संग्राम जगताप, युवकचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते, सरचिटणीस अविनाश आदिक, युवा नेते आशुतोष काळे, कार्याध्यक्ष संदीप वर्पे, युवकचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार, महिला जिल्हाध्यक्ष मंजुषा गुंड, कार्याध्यक्ष संजय कोळगे आदी उपस्थित होते.
पवार म्हणाले, आज सरकार नसतांनाही लोकांच्या अपेक्षा राष्ट्रवादीकडे आहे. सत्ते असलेल्यांनाही काही कळत नाही.त्यामुळे त्यांना राष्ट्रवादीकडून अपेक्षा आहे. त्यामुळे त्याचा फायदा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घेतला पाहिजे. सर्वसामान्यांची मदत करून त्यांना दिलास देण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. सरकारला गांभीर्य कळत नाही. आज राज्यात दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे. पाऊस नसल्याने शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहे. पण सरकार याकडे दुर्लक्ष करीत आहे. किल्लारीच्या कार्यक्रमांत मुख्यमंत्र्यांचे याकडे लक्ष वेधले. नगर जिल्ह्यात पाऊस नसल्याने दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे. परंतू त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. अशीच स्थिती राहिली तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर होण्याची शक्‍यता आहे. केंद्र व राज्यातील सरकारकडून योग्य ती पावले उचलली जात नसल्याने सर्वसामान्यांची परवड होत आहे. असे पवार म्हणाले.
पतंप्रधान मन की बात म्हणून बोलतात. पण त्यांना जन की बात कळत नाही. केंद्र सरकारने 81 हजार कोटी कर्जमाफी दिली. पण ती शेतकऱ्यांना नाही तर उद्योजकांना दिली आहे. कॅनडा, बडोदा यासारख्या बॅंकांमध्ये ही रक्‍कम उद्योजकांच्या खात्यात जमा करून त्यांना कर्जमुक्‍त केले आहे. परंतू राज्यातील शेतकरी अद्यापही कर्जमुक्‍त झाला नाही. असे पवार म्हणाले.
जयंत पाटील म्हणाले, पक्ष संघटना मजबूत करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी बुथ कमिट्या तयार करण्यात येत आहे. आतापर्यंत 48 हजार कार्यकर्ते बुथ कमिटीच्या माध्यमातून पक्षाला जोडला गेला असून त्यात आणखी वाढ होत आहे. एवढेच नाही तरी पक्षाच्या प्रत्येक सेलच्या सर्व मतदारसंघात बैटका व मेळावे होणार आहे. तसेच घोगडी बैठकीच्या माध्यमातून पक्षाची ध्येयधोरणे सर्वसामान्यापर्यंत पोहचविण्यात येणार आहे. तसेच पक्षाच्या नेत्यांच्या जाहिरसभा देखील होणार आहे. यामाध्यमातून पक्षाने लोकसभा व विधानसभा निवडणुकीचा प्रचारच सुरू केला आहे. पक्षातील मोठ्या नेत्यांचे नाव बुथ कमिटीमध्ये असणे आवश्‍यक असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.
दिलीप वळसे म्हणाले, कार्यकर्त्यांनी शिस्त पाळावी, पक्षाशी एकनिष्ठ रहावे, पक्षाची ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न केले तरच विधानसभेत सहापेक्षा जास्त आमदार निवडून येतील. यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी प्रास्ताविक केले.

परस्पर उमेदवाऱ्या वाटू नका
लोकसभा निवडणुकीतील जागा वाटपाचा निर्णय शरद पवार घेणार आहे. ते उमेदवार देखील ठरविणार असल्याने कोणी परस्पर विधाने करू नये, तसेच उमेदवाऱ्या वाटू नका, जाहिरपणे मत व्यक्‍त करून नका, तुम्हाला काय वाटते ते पक्षाशी बोला. चार भितीच्या आत बोला. आपली संख्या वाढली पाहिजे. पारनेरचा वाद घरात मिटला असता पण त्याची बाहेर लक्‍तरे टांगली असल्याचे जयंत पाटील म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)