एक लाख थकबाकीदारांना नोटीस

पिंपरी – मार्च एंडींगमुळे महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाची धावपळ सुरू आहे. महापालिकेने मालमत्ता कराच्या रकमेची व थकबाकीची वसुली प्रभावीपणे करण्यासाठी थकबाकी असलेल्या 1 लाख 13 हजार 272 मिळकत धारकांना नोटीस काढल्या आहेत. त्यातील 38 हजार 386 मिळकत धारकांना नोटीस बजावली असून अद्याप 74 हजार 886 मिळकत धारकांना जप्ती पूर्व नोटीस देणे बाकी आहे.

शहरातील थकबाकीदारांनी वेळेत मालमत्ता कर न भरल्यास त्यांच्यावर जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे पालिकेच्या जप्तीच्या नोटीसीने मिळकतदारांना धडकी भरली आहे. महापालिकेच्या मालमत्ता कराच्या रकमेची व थकबाकीची वसुली प्रभावीपणे झाल्यास त्यांची आर्थिक सक्षमता वाढण्यास आणि पर्यायाने मुलभूत सुविधा कार्यक्षमतेने उपलब्ध करुन देण्यास मदत होणार आहे. त्यामुळे आर्थिक सक्षम करण्यासाठी महापालिकेने 31 मार्च अखेर शंभर टक्के वसुली करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यामध्ये 5 हजार पुढील सर्व थकबाकीदारांना नोटीस देवून कर भरण्याचे स्मरण करून दिले होते, मात्र त्यांनी कर न भरल्याने 1 लाख 13 हजार 272 थकबाकीदारांना जप्तीच्या कारवाईची नोटीस काढली आहे.

-Ads-

महापालिकेच्या 16 कर संकलन विभागात आज अखेर 344.86 कोटीचा भरणा झाला आहे. मिळकतदारांच्या सोयीसाठी साप्ताहिक सुट्टीलाही 16 कर आकारणी व कर संकलन केंद्रे सुरू आहेत. तसेच, मोठ्या थकबाकीदारांकडून थकीत रकमेची प्राधान्याने वसुली करण्यात येणार असून ती न झाल्यास त्यांच्यावर तातडीने जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे.

सुमारे 400 कोटींची थकबाकी
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर संकलन विभागात सुमारे 1 लाख रकमेवरील थकबाकीदारांची संख्या सुमारे 5 हजार 847 आहे. 404 कोटी 59 लाख 44 हजार 897 एवढी थकबाकी त्यांच्याकडून येणे आहे. महापालिकेच्या कर संकलन विभागाच्या वसुली पथकाने थकबाकीदारावरही जप्तीची मोहीम हाती घेतली आहे. यामध्ये सर्वांधिक वसुली ही थेरगाव परिसरात 1 हजार 238 मिळकतदारांकडे आहे. महापालिकेच्या कर संकलन विभागातील निगडी प्राधिकरणात 157 मिळकतदारांकडे सुमारे 52 कोटी, आकुर्डीतील 409 मिळकतदारांकडे सुमारे 21 कोटी, चिंचवडच्या 533 मिळकतदारांकडे सुमारे 41 कोटी, सांगवीत 344 मिळकतदारांकडे सुमारे 16 कोटी, पिंपरी वाघेरेच्या 276 मिळकतदारांकडे सुमारे 20 कोटी, पिंपरी 85 मिळकतदारांकडे सुमारे 39 लाख, मनपा भवन 241 मिळकतदारांकडे सुमारे 74 कोटी, फुगेवाडी दापोडी 313 मिळकतदारांकडे 22 कोटी, भोसरीच्या 762 मिळकतदारांकडे 31 कोटी, चऱ्होलीच्या 88 मिळकतदारांकडे 4 कोटी, मोशीच्या 151 मिळकतदारांकडे 69 कोटी, चिखलीच्या 954 मिळकतदारांकडे 56 कोटी, तळवडेच्या 179 मिळकतदारांकडे 14 कोटी आणि किवळेच्या 117 मिळकतदारांकडे 42 कोटी अशी एकूण 5 हजार 847 मिळकतदारांकडे सुमारे 404 कोटी 59 लाख 44 हजार 897 थकबाकी आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)