‘एक राष्ट्र-एक कर’ आणि ‘एक राष्ट्र-एक परमिट’बाबत चर्चा

नवी दिल्ली : रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने स्थापन केलेल्या परिवहनावरील मंत्रिगटाने सर्व राज्यांमधील वाहनांसाठी पथकराच्या समान रचनेची शिफारस केली. गुवाहाटी येथे झालेल्या बैठकीत, मंत्रिगटाला असे आढळून आले की समान कररचनेमुळे कमी कर असलेल्या राज्यांमध्ये जाऊन नोंदणी करण्याच्या लोकांच्या वृत्तीला आळा बसेल. वाहनांचे स्थानांतरण आवश्यक असलेल्या प्रकरणांमध्ये यामुळे दिलासा मिळेल.

मंत्रीगटाने मालवाहतुकीसाठी राष्ट्रीय बस आणि टॅक्सी परमिटची देखील शिफारस केली. देशात सार्वजनिक वाहतुकीत वार्षिक दोन टक्के वाढ नोंदवली जात आहे तर खासगी वाहतुकीत वार्षिक 20 टक्के वाढ होत आहे. राष्ट्रीय परमिटमुळे सार्वजनिक वाहतुकीला आवश्यक चालना मिळेल आणि रस्त्यांवरील वाहनांची कोंडी कमी होईल.

-Ads-

वाहनांसाठी पर्यायी इंधनाला प्रोत्साहन देण्यासाठी मंत्रिगटाने इलेक्ट्रिक वाहनांसाठी परमिट प्रणालीच्या उदारीकरणाची शिफारस केली होती. याशिवाय, डिझेल वाहनांवरील कर दोन टक्क्याने वाढवण्याची आणि इलेक्ट्रिक वाहनांवरील कर कमी करण्याची शिफारस केली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)