एक नवरा, 120 बायका

पतीव्रता, एकपत्नीत्त्व यांसारखे संस्कार आपल्याकडे वर्षानुवर्षांपासून केले जातात. अर्थात तरीही आपल्या देशात एकाहून “अनेक’ लग्ने झालेली उदाहरणे आढळतात. (विवाहबाह्य संबंधांबाबत तर न बोललेचे बरे) अशा पुरुषांविषयी सामान्य माणूस बोलताना एक वाक्‍य नेहमीच बोलतो ते म्हणजे “एक सांभाळता सांभाळता नाकी नऊ आलेत आणि दुसरं कुठून करायचं’! यातील विनोदाचा भाग वगळला तरी त्यामध्ये आपल्यावरील झालेल्या संस्कारांची बीजे दिसून येतात.

मात्र, विदेशांमध्ये अनेक विवाह करणाऱ्यांची संख्या बरीच असलेली दिसून येते. यामध्ये विक्रमवीर ठरेल असा एक माणूस थायलंडमध्येही आहे. या व्यक्तीने आतापर्यंत 120 लग्नं केली आहेत. तंबन प्रैझर्ट असे या व्यक्तीचे नाव आहे. तंबन आपल्या 120 बायकांचाही आदर करतात. त्यांचे सर्व लाडही पुरवतात. प्रत्येकीला एकमेकांबद्दल सर्व माहीत आहे, हे या घराचे विशेष आहे. तंबन आता 58 व्या वर्षांचे आहेत. आतापर्यंत झालेल्या 120 लग्नांमधून त्यांना 28 मुले झाली आहेत. बांधकाम व्यावसायिक असलेले तंबन थायलंडमधील नकोन नायोक प्रांतातील फ्रॉमनी जिल्ह्याचे प्रमुख आहेत.

त्यांनी सांगितले, मी 17 वर्षांचा होतो तेव्हा माझं पहिलं लग्न झालं. माझी पत्नी माझ्यापेक्षा 2 वर्षांनी लहान होती. आम्हाला 3 मुलं झाली. त्यानंतर माझ्या आयुष्यात एकामागोमाग एक स्त्रिया येतंच गेल्या. यापैकी बहुतांश स्त्रिया तरुण होत्या. त्यांचे वय 20 वर्षांपर्यंत होते. जेव्हा मी नवीन घर बनवायचो तिथे एक नवी पत्नीही मिळायची. मी या सर्वांवर प्रेम करतो आणि त्यादेखील माझ्यावर प्रेम करतात. या व्यवसायामुळे मला ही सवय लागल्याचे ते म्हणतात. प्रत्येक लग्न करण्याआधी तंबन आपल्या पूर्वीच्या सर्व पत्नींना याबद्दल सांगतात. लग्न करणार असलेल्या मुलीच्या घरी जाऊन रितसर परवानगी घेत पारंपरिक पद्धतीने लग्न करतात. तंबन यांच्या 22 पत्नी फ्रॉमनी जिल्ह्यातल्या त्यांच्या घराच्या आसपास राहतात.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
4 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)