‘एक देव आणि दुसरे दानव’ एवढाच दोन दानवेत फरक- ईश्वर बाळबुधे

जालना: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे यांनी नाव न घेता भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे याना जोरदार टोला लगावला आहे.

“जालना जिल्ह्यात अराजकता, हुकुमशाही, सामान्य जनतेत असलेली दहशत, भय संपवायचं असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी उभे रहात लोकसभा, विधानसभेत आदरणीय शरद पवार साहेब, अजित दादा, राजेश भैय्या टोपे यांना ओबीसी बांधवांनी सहकार्य करावे”, असे आवाहन देखील त्यांनी केली. ते भोकरदन विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी विभाग आढावा बैठक व मेळावा या कार्यक्रमात बोलत होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, माजी आमदार चंद्रकांत दानवे यांची या कार्यक्रमाला उपस्थिती होते. यावेळी दोन दानवेत फरक काय तर एक देव आणि दुसरे दानव असे वक्तव्य बाळबुधे यांनी कुणाचेही नाव न घेता केले. आपले सामाजिक प्रश्न सोडविण्याची दानत फक्त आणि फक्त शरद पवार साहेब यांच्यातच आहे, असे ते यावेळी म्हणाले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)