एक दिवस मोफत बस प्रवास “दप्तरी’

पिंपरी – बस या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेकडे अधिकाधिक नागरिकांनी आकर्षित व्हावे म्हणून पीएमपीएलने महिन्यातून एकदा मोफत बस प्रवास’ उपक्रमाचे नियोजन केले होते. मात्र, वर्षाच्या 12 दिवसांसाठी तब्बल 4 कोटींचा भार पिंपरी- चिंचवड महापालिकेवर पडत आहे. त्यामुळे तो प्रस्ताव स्थायी समितीने दप्तरी दाखल केला आहे.

स्थायी समिती सभा मंगळवारी (दि. 4) झाली. अध्यक्षस्थानी विलास मडिगेरी होते. नागरिकांनी बसने प्रवास करण्यासाठी आणि त्यांना आकर्षित करण्यासाठी दर महिन्यातून एक दिवस मोफत बस प्रवास सवलत योजना पीएमपीएलने आखली होती.

-Ads-

या संदर्भात विलास मडिगेरी यांनी सांगितले की, योजनेअंतर्गत वर्षातील 12 दिवसासाठी पालिकेवर तब्बल 4 कोटींचा खर्चाचा वाढीव भार पडणार आहे. पालिका दर महिन्यास पीएमपीएलला संचलन तुटीपोटी 7 कोटी 50 लाख रूपये अदा करीत आहे. या वाढीव 4 कोटींच्या खर्चाच्या बदल्यास दरमहा सुमारे 30 ते 35 लाख रूपये पालिकेस पीएमपीएलला अदा करावे लागणार आहेत. एलबीटी बंद झाल्याने पालिकेचे उत्पन्नाचे स्त्रोत कमी झाले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात खर्च करता येत नसल्याने समितीने सदर विषय दप्तरी दाखल करून फेटाळून लावला आहे. नागरिकांना एकदा मोफत बसची सवय लागली की, ती मोडणे अवघड होऊन बसणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)