एक दिवसाच्या दिलाशानंतर पुन्हा पेट्रोल, डिझेल दरवाढ

नवी दिल्ली – इंधन भडक्‍यामुळे मेटाकुटीला आलेल्या सामान्य जनतेला दरवाढीतूून मिळालेला दिलासा एक दिवसापुरताच मर्यादित ठरला. मागील काही दिवसांपासून सलगपणे सुरू असलेले पेट्रोल, डिझेल दरवाढीचे सत्र बुधवारी थांबले. मात्र, गुरूवारी पुन्हा त्या इंधनांमध्ये लिटरमागे अनुक्रमे 13 आणि 11 पैशांची वाढ झाली.

दरवाढीमुळे देशाची राजधानी दिल्लीत प्रथमच पेट्रोलची किंमत 81 रूपये झाली. तर डिझेल दराने नवा उच्चांक गाठत 73.08 रूपयांवर उडी घेतली. देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोल 88.39 रूपयांवर तर डिझेल 77.58 रूपयांवर पोहचले. मुंबईत दोन्ही इंधनांवर देशातील इतर महानगरांपेक्षा सर्वांधिक कर आकारला जातो. दिल्लीत इतर महानगरांपेक्षा सर्वांत कमी इंधन दर आहेत.

जागतिक बाजारात कच्च्या इंधनांच्या दरांनी प्रतिपिंप 80 अमेरिकी डॉलर्सची पातळी गाठली आहे. तर अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रूपयाने नीचांकी मूल्य गाठले आहे. त्या दोन्ही घटकांमुळे कच्च्या इंधनांची आयात महागली आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचे सत्र कायम आहे. ऑगस्ट महिन्याच्या मध्यापासून आतापर्यंत पेट्रोल 3 रूपये 92 पैशांनी तर डिझेल 4 रूपये 31 पैशांनी महागले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)