एक तपानंतर माकडांची सुटका

गोंदवले – शिखर शिंगणापूर (ता. माण) येथे लोकांना त्रास देत असल्याबद्दल बंदी करून ठेवलेल्या चार माकडांना एक तपानंतर वनविभागाने शनिवारी रात्री मुक्त केले. शिखर शिंगणापुरात महंमद अब्दुल मुलाणी यांनी गेल्या बारा वर्षांपासून लाल तोंडाचा एक नर व तीन मादी अशा चार माकडांचा कायद्याच्या अज्ञानातून सांभाळ केला होता.

याबाबत तहसीलदार बी. एस. माने व वन विभागाकडे एक तक्रार आली होती. त्यानुसार वन विभागाने तात्काळ पाहणी करून माहिती घेतली. त्यावेळी ही माकडे लोकांना त्रास देत असल्याने साखळीने बांधून ठेवले असल्याची कबुली मुलाणी यांनी दिली. मात्र, माकडांना चांगल्या प्रकारे सांभाळल्याचा दावाही केला आहे. दररोज ते त्यांना खाद्य देत होते.

-Ads-

यातून त्यांना चांगलाच लळा लागलेला होता. कायद्याच्या अज्ञानातून हा गुन्हा असल्याने पुन्हा असा गुन्हा करू नये, अशी ताकीद देऊन माकडांची सुटका करण्यात आली. वन विभागाचे एस. के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक यु. बी. ठोंबरे व वनपाल ए. डी. सावंत यांनी ही कारवाई केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)