एक टन निर्माल्य, 155 गणेशमूर्तींचे दान

वाकड – दिड दिवसांच्या गणरायांना निरोप देताना गणेशभक्‍तांनी पर्यावरणाचा विचार करत 155 गणेशमूर्ती आणि सुमारे एक टन निर्माल्य सामाजिक संस्थांना दान केले. संस्कार प्रतिष्ठान, टाटा व्हॉलेंटिअरिंग टाटा मोटर्स आणि डॉ. डी. वाय. पाटील फार्मास्युटिकल सायन्स अँड टेक्‍नालॉजी रिसर्च सेंटर पिंपरी यांच्या संयुक्‍त विद्यमाने पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा उपक्रम राबवण्यात येत आहे. दिड दिवसाच्या गणपती विसर्जनाच्या दिवशी थेरगाव पुल, घाट चिंचवडगाव येथे 155 गणेशमुर्तींचे दान मिळाले या शिवाय एक टन निर्माल्यदान स्विकारले. दान घेतलेल्या मुर्तींचे विनोदेवस्ती जवळील तळ्यात विधीवत विसर्जन करण्यात आले. या संस्थांच्या वतीने 145 सहकारी चिंचवड पोलीस स्टेशनच्या हद्दीत स्थानिक पोलीसांना गणेशोत्सव बंदोबस्ताला मदत करीत आहेत. पोहण्यात तरबेज असलेल्या आठजणांची टीम विसर्जन घाटावर तैनात करण्यात आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)