एक कोटींच्या सिगारेट्‌स असलेला ट्रक पळवला 

ठाणे: पालघर जिल्ह्यातून एका टोळीने एक कोटी रूपयांच्या सिगारेट असलेला ट्रक पळवून नेल्याची घटना घडली आहे. बुधवारी सायंकाळी मुंबई-अहमदाबाद मार्गावरील वाघोबा खिंडीत हा प्रकार घडला. हा ट्रक मुंबईहून जयपुरकडे निघाला होता. पालघर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. नंतर हा ट्रक मध्यप्रदेशच्या बुऱ्हाणपुर जिल्ह्यात बेवारस सोडून दिलेला आढळला. त्यातील सिगारेटचा माल जशाच्यातसाच सापडला आहे. ज्या सात जणांच्या टोळीने हे कृत्य केले आहे त्यांचा शोध आता घेतला जात आहे.

ट्रक चालक चंचलसिंग याला मारहाण करून आणि त्याला चाकुच्या धाकाने धमकाऊन टोळीने हा ट्रक ताब्यात घेतला आणि चालकाला त्यांनी मारहाण करून जवळच्याच जंगलात फेकून देऊन त्यांनी ट्रकसह पलायन केले. नंतर हा ट्रक मध्यप्रदेशात बेवारस सोडून दिल्याचे आढळून आले अशी माहिती त्या राज्यांच्या पोलिसांनी दिली. तो ट्रक ताब्यात घेण्यासाठी एक पथक तिकडे पाठवण्यात आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)