एक ऑगस्टपासून संगणकीकृत सातबारे

हिंजवडी -1 ऑगस्ट 2017 पासून संपूर्ण संगणकीकृत सातबारे उपलब्ध होणार असल्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी सांगितले.
भरे (ता. मुळशी) ;डषड डिजिटल इंडिया राष्ट्रीय भूमिअभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम अंतर्गत मुळशी तहसील तर्फे सातबाऱ्यांच्या चावडी वाचनाचा कार्यक्रम जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ठेवण्यात आला होता. यावेळी व्यासपिठावरुन उपस्थितांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी राव बोलत होते. या कार्यक्रमास मुळशी-मावळचे प्रांत अधिकारी सुभाष भागडे, मुळशी तहसीलदार सचिन डोंगरे, सभापती कोमल वाशिवले, गटविकास अधिकारी स्मिता पाटील, भरे सरपंच संगिता खरात आदि मान्यवर उपस्थित होते.
जिल्हाधिकारी राव म्हणाले, गावाचा विकास झाल्याशिवाय देशाचा विकास होणार नाही, म्हणूनच गावाचा विकास करायचा असेल तर सातबाऱ्यांच्या नोंदी योग्य असतील तर विकास करणे सोयीस्कर होईल. त्यामुळे संगणकीकृत सातबारे उपलब्ध करून देताना शासकीय अधिकाऱ्यांनी नोंदी बरोबर झाल्या आहेत, असे म्हणणे हे शासनाला मान्य नव्हते. जमिनीच्या मालकांनी त्याबरोबर आहे, असे म्हणणे आवश्‍यक असल्याने सातबाऱ्यांचे चावडी वाचन उपक्रम राबवण्यात आला आहे. मुळशी तालुक्‍यातील सातबाऱ्यांचे 95 टक्के संगणकीकरण झाले असून, येत्या आठ दिवसांत उर्वरीत काम पूर्ण होईल. तसेच जिल्ह्यातही 80 टक्के काम झाले असल्याचेही त्यांनी सांगितले.
चावडी वाचन सुरूअसताना शेतकरी, जमीन मालकांनी उपस्थित केलेल्या शंका दूर करून उपस्थितांकडून आलेल्या सुचनांचा स्विकार करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी तयारी दर्शविली. जमिनीच्या सातबाऱ्यांवर इकरार नोंदी कायम राहतात. त्या वेळोवेळी कमी न केल्याने तलाठी तसेच जमिन मालकांनाही त्रास होतो, त्या संबंधित बॅंका, संस्थेकडून ना हरकत पत्र घेऊन वेळोवेळी इकरार नोंदी रद्द केल्या जातील, असे आश्वासनही जिल्हाधिकारी राव यानी दिले. तसेच भरे गावचे माजी सरपंच यांनी भरे ग्रामस्थ पुराच्या नैसर्गिक आपत्तीपासून सुरक्षित राहण्यासाठी गायरानात वसाहत केली आहे. त्यास गावठाण विस्तारास मंजुरी द्यावी, अशी विनंती केली असता त्यासही राव यांनी हिरवा कंदील दर्शविला आहे.
यावेळी उपस्थितांमध्ये तलाठी हनुमंत चांदेकर, ग्रामस्थ आबासाहेब शेळके, शंकर ववले, सतिश ववले, दिलीप ववले, नारायण ववले, आत्माराम ववले, आणि मान्यवर होते. प्रांत अधिकारी सुभाष भागडे यांनी प्रास्ताविक केले तर तहसीलदार सचिन डोंगरे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)