यवत- एक उम्मीद सोशल फाऊंडेशन यांच्या वतीने दौंड तालुक्‍यातील भांडगाव येथील रोकडोबानाथ विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना शनिवारी (दि.8) 41 सायकलींचे मोफत वाटप करण्यात आले. या फाऊंडेशनच्या वतीने मोफत सायकल वाटप करण्याचे हे दुसरे वर्ष असून या फाऊंडेशनने हाती घेतलेल्या स्तुत्य उपक्रमामुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
पुणे येथील 10 सदस्य एकत्र येत या सदस्यांनी एक उम्मीद सोशल फाऊंडेशनची स्थापना केली आहे. या सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून ग्रामीण भागातील गरीब आणि शाळेपासून 2 ते 3 किलोमीटर दूर राहणाऱ्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींची पायपीट थांबून गैरसोय दूर व्हावी. या हेतूने त्या विद्यार्थ्यांना मोफत सायकल भेट देण्याची संकल्पना या सदस्यांनी मांडली. त्यानुसार 2017 पासून या “एक उम्मीद’ सोशल फाऊंडेशनने काम सुरू केले. त्यानुसार आज या फाऊंडेशनच्या माध्यमातून भांडगाव येथील विद्यार्थ्यांना 41 सायकलींचे मोफत वाटप केले. गेल्या वर्षीही या फाऊंडेशनच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांना 400 सायकलींचे मोफत वाटप केले असून यापुढेही असेच गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकली वाटपाचे काम करण्यात येणार असल्याचे फाऊंडेशनच्या सदस्यांकडून सांगण्यात आले. भांडगाव येथील विद्यार्थ्यांना मोफत सायकली मिळाव्यात. यासाठी दौंड तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस युवकचे उपाध्यक्ष रामदास दोरगे यांनी या सोशल फाऊंडेशनकडे पाठपुरावा केला होता. विद्यार्थ्यांना मिळालेल्या सायकलमुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.
विद्यार्थ्यांना सायकल वाटप कार्यक्रमाप्रसंगी एक उम्मीद सोशल फाऊंडेशन सदस्य अमित शहा, बलजित खिच्चर, मनिष कोठारी, हितेश जैन, पंचायत समिती सदस्य नितीन दोरगे, यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरज बंडगर, माजी पंचायत समिती सदस्य कुंडलिक खुटवड, दौंड तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस युवकचे उपाध्यक्ष रामदास दोरगे, बाळासाहेब दोरगे, विजय शेंडगे, मुख्याध्यापक सतीश कदम, राजेंद्र जगताप, संतोष दोरगे यांच्यासह आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)