एक्‍स्प्रेस-वे प्रवाशांसाठी पोलिसांची हेल्पलाइन

File photo

कोंडी, अपघात टाळण्यासाठी काळजी घेण्याचे आवाहन

पुणे – पुणे-मुंबई महामार्गावर वाहतूक वाढण्याची आणि वाहतूक कोंडी होण्याची शक्‍यता आहे. त्यातूनच अपघातामध्ये वाढ होण्याची शक्‍यता गृहीत धरुन महामार्ग पोलीसांनी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून महामार्ग पोलिसांच्या वतीने महामार्गावर आणि पोलीस ठाण्यांमध्ये प्रवासी आणि अपघातग्रस्तांसाठी खास मदत कक्ष सुरु करण्यात येणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

वाहनचालक आणि प्रवाशांसाठी हेल्पलाइन नंबर देण्यात आले आहेत. काही आपत्ती ओढवल्यास या नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन महामार्ग पोलिसांनी केले आहे.

सुट्टी आणि सणासुदीत या महामार्गावरील वाहतूक कोंडी ही नित्याचीच बाब झाली आहे. त्यातूनच छोटे मोठे अपघात होण्याच्या घटनाही घडल्या आहेत. अशा प्रसंगी मदत मिळविताना तारेवरची कसरत करावी लागते. त्यातूनच वेळेवर मदत न मिळाल्याने अनेकांना हकनाक जीव गमवावा लागतो. अपघातग्रस्तांना तातडीने मदत मिळावी, यासाठी महामार्ग पोलिसांनी ठिकठिकाणी मदत केंद्र सुरू केले आहेत. त्यामुळे अपघातग्रस्त आणि वाहनचालकांनी आपत्तीच्या प्रसंगी या कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन महामार्ग पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी केले आहे.

पार्किंग लाईट सुरू करा
महामार्ग अथवा अन्य रस्त्यावरील बहुतांशी अपघात हे वाहने बंद पडल्यामुळे होत असल्याची बाब आतापर्यंत निदर्शनास आली आहे. त्यामुळे याबाबत वाहतूक अथवा महामार्ग पोलिसांच्या वतीने आतापर्यंत वाहनचालकांमध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात आली. पण, त्याबाबत फारसे गांभीर्याने घेतले जात नसल्याचे वाढत्या अपघातांमुळे स्पष्ट झाले आहे. महामार्गावर वाहन बंद पडल्यास वाहनचालकांनी तत्काळ वाहनाचे पार्किंग लाईट सुरू करावेत आणि अपघात टाळण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन महामार्ग पोलिसांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)