एक्‍सप्रेस हायवे वर वाहतूक धीम्या गतीने

  • लोणावळा शहरात वाहतूक कोंडी

लोणावळा – सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे मुंबई-पुणे एक्‍सप्रेस हायवेवर वाहनांची संख्या वाढल्याने खंडाळा बोर घाटात शनिवारी (दि. 28) वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी झाली.

अचानक वाढलेली वाहनांची संख्या आणि अमृतांजन पुलाच्या चढावर काही वाहने बंद पडल्याने शनिवारी पहाटे पासूनच मुंबईकडून पुण्याकडे येणारी वाहतूक मंदावली होती. ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी बोर घाट महामार्ग पोलीस प्रयत्न करीत होते; मात्र तरीही अमृतांजन पुलापासून मुंबईच्या दिशेने शनिवारी सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत सलग साधारण 3 ते 4 किलोमीटर तर कधी कधी त्याहून अधिक लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अखेर साडेअकरानंतर ही वाहतूक कोंडी हळूहळू पूर्वपदावर येवू लागली.

-Ads-

एक्‍सप्रेस हायवेवरील या वाहतूक कोंडीचा परिणाम लोणावळा शहरातून जाणाऱ्या जुन्या राष्ट्रीय महामार्गावर बघायला मिळाला. या मार्गावर लोणावळा शहरातील कुमार रिसॉर्ट चौकापासून मुंबई आणि पुणे या दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे झालेल्या वाहतूक कोंडीमुळे पर्यटकांसोबतच स्थानिकांनाही मोठा त्रास सहन करावा लागला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)