“एक्‍सप्रेस वे’वर प्रवासी बस-कंटनेरच्या धडकेत दहा प्रवासी जखमी

लोणावळा (वार्ताहर) – पुणे-मुंबई एक्‍सप्रेस वेवर लोणावळ्याजवळील सिंहगड कॉलेजसमोर कंटेनर आणि प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसच्या अपघातात बसमधील 10 प्रवासी जखमी झाले आहेत. यामध्ये बसचालकासह तीन जण गंभीर जखमी आहेत. मंगळवारी ( दि. 24) भल्यापहाटे दीडच्या सुमारास ही घटना घडली. सर्व जखमींवर निगडीतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

शिवाजी शामराव मोहिते (वय 50, रा. ठाणे), अक्षय शंकर हाके (वय 25, रा. माण, सातारा), तुळसा प्रसाद सुब्रमण्यम (वय 55), रोहित प्रसाद सुब्रमण्यम (वय 29, दोघेही रा. विरार, मुंबई), वेदांत संतोष करकुटे (वय 8), संतोष मारुती करकुटे (वय 39, रा. कांजूर, मुंबई), प्रजास अर्जुन शिवले (वय 13, रा. चुनाबट्टी, मुंबई), सुनील प्रकाश गुरव (वय 18, कोल्हापूर) अशी बसमधील जखमी प्रवाशांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईहून कोल्हापूरला निघालेल्या वैभवलक्ष्मी ट्रॅव्हल्स कंपनीच्या बसची (एम.एच.4/जी.पी./2226) लोखंडी कॉईलची वाहतूक करणाऱ्या कंटेनरला (एम.एच.06/एक्‍यु/7429) लोणावळ्या जवळील सिंहगड कॉलेजसमोर किलोमीटर क्रमांक 58 येथे मागून जोरात धडक बसून अपघात झाला. या अपघातात बस चालकासह 10 प्रवासी जखमी झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच “आयआरबी’च्या “देवदूत’ या आपत्कालीन पथकाने महामार्ग पोलिसांच्या मदतीने सर्व जखमींना उपचारासाठी निगडी येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. जखमींवर उपचार सुरू असून, प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. लोणावळा ग्रामीण पोलीस तपास करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)