एक्‍सपायरी जवळ आलेल्या ब्लड बॅग ससूनकडे हस्तांतरीत

पिंपरी- रक्तदाता रक्तदान करुन आपले रक्त रक्तपेढीला देतो. ते रक्तपेढीच्या माध्यमातून ज्याला रक्ताची गरज आहे त्याला पुरवले जाते. परंतु औँध जिल्हा रुग्णालायातील अधिकाऱ्यांच्या ढिसाळ आणि बेजबाबदार कारभारामुळे रक्तपेढीतील एक्‍सपायरीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळेच चार दिवसांवर एक्‍सपायरी आलेल्या रक्तांच्या पिशव्या ससून विभागीय रक्तपेढीकडे पाठवल्या गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे यातुन रक्तदाच्याची थट्टाच या रक्तपेढीकडून सुरु असल्याचा अरोप रुग्णालय परिसरातील कार्यकर्त्यांनी केला आहे. तसे पत्रही प्रसिध्द करण्यात आले आहे.

नुकत्याच औंध जिल्हा रुग्णालयाने एक्‍सपायरी जवळ आलेल्या रक्तांच्या 14 पिशव्या ससून विभागीय रक्तपेढीकडे पाठविल्या. या पिशव्या 29 ऑगस्टला एक्‍सपायर होणार असल्याने त्या तातडीने ससून रक्तपेढीकडे पाठविण्यात आल्या.त्याचबरोबर रक्तपेढीने ससून विभागीय रक्तपेढीला पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे, की आमच्या रक्तपेढीने पाठविलेल्या पिशव्या स्विकाराव्यात. तसेच पत्रामध्ये रक्तपेढीने रक्तगटांचाही उेल्ल्ख केला आहे. त्यामध्ये ए पॉझिटिव्ह , बी पॉझिटिव्ह, आणि ओ निगेटिव्ह आदी रक्तगटांचा समावेश आहे. रक्तपेढींच्या नोंदवहीमध्ये तसा स्पष्ट उल्लेख आहे. त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले गेलेले नाही. त्यामुळे अत्यंत घाईघाईने 24 ऑगस्ट रोजी रक्तांच्या पिशव्या ससून रुग्णालायाला का पाठविल्या गेल्या या कारणांचा शोध घ्यावा अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे. यावर कोणतेही रक्त वाया जावु द्यायचे नाही असे आरोग्य खात्याचे स्पष्ट आदेश आहेत. तसेच जिल्ह्यातील सर्व रक्तपेढ्या एकमेकांशी संलग्न्‌ आहेत. त्यामुळे प्रत्येक रक्तपेढीला त्यांच्या गरजेनुसार तसेच एक्‍सपायरीपुर्वी रक्त पाठविता येते. अनेकदा आमच्याकडे जेवढे रक्त संकलित होते तेवढी मागणी नसते. अशावेळी आम्ही ते अन्य रक्तपेढ्यांनाही पाठवतो. या पिशव्यांची एक्‍सपायरी जवळ आल्यानेच त्या विनाशुल्क ससूनला पाठविण्यात आल्या आणि त्यात काहीही गैर नसल्याचे औंध जिल्हा रुग्णालायातील रक्तपेढीच्या अधिकारी सी. जी. कलाल यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)