एक्झिटपेक्षा एक्झँट पोल महत्वाचा – जावडेकर

पुणे  – एक्झीट पोल ही एक चर्चा आहे. ही चर्चा खुशाल व्हावी. मात्र, अकरा तारखेला खरे चित्र समोर येणार असून एक्झिटपेक्षा एक्झाँट पोल महत्वाचा आहे, असे म्हणत मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांंनी एक्झिट पोलवर होणाऱ्या चर्चेला पुर्णविराम दिला.

श्री महिला गृह उद्योग लिज्जत पापड सुवर्ण महोत्सवानिमित्त लिज्जत रत्न पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमानंतर त्यांनी हे मत व्यक्त केले. नूकत्याच मध्यप्रदेश , राजस्थान, छत्तीसगडसह पाच राज्याच्या निवडणूका पार पडल्या. निवडणूकीनंतर राजस्थान, मध्यप्रदेश या दोन महत्वाच्या राज्यात सत्तापालट होऊन काँग्रेसचे सरकार येईल अशी चर्चा केली जात आहे.

-Ads-

काही माध्यमांनीही एक्झिट पोलच्या माध्यमातून सरकार बदलणार असल्याचे भाकीत केले आहे. यावर जावडेकर यांनी हे मत व्यक्त केले आहे. निवडणूकीनंतर अनेक एक्झिट पोल येतात. त्यावर चर्चाही केली जाते. प्रत्येक निवडणूकीनंतर अशा चर्चा होतात. मात्र, चर्चा करणाऱ्यांना अकरा तारखेला खर चित्र दिसेल आणि ते महत्वाच आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
61 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
1 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)