एकीच्या बळावर संस्थेचा वट वृक्ष होतो

श्रीधर किंद्रे यांचे प्रतिपादन

भोर- कोणत्याही संस्थेच्या विचारांचा पाया भक्‍कम असला आणि एकी असल्यास त्या संस्थेचा वटवृक्ष होण्यास वेळ लागत नाही, असे प्रतिपादन भोर तालुका पंचायत समितीचे उपसभापती श्रीधर किंद्रे यांनी केले.
निर्भय भारत या सामाजिक संघटनेच्या वतीने भोर तालुका शिक्षक संघटनेच्या सभागृहात तालुक्‍यातील बांधकाम क्षेत्रातील कष्टकरी कामगार व महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी किंद्रे बोलत होते. कार्यक्रमात अक्षय कामथे, जिल्हा परिषदेचे सदस्य विठ्ठल आवाळे, भोर तालुका पंचायत समितीचे गट विकास अधिकारी संतोष हराळे, कामगार नेते ज्ञानोबा घोणे, सरपंच प्रकाश बरदाडे, प्रमोद पाटील, बाळासाहेब सुतार, वसंत मोरे, माया मालुसरे, किरण आवाळे समवेत कामगार व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी आवाळे यांनी सांगितले की, निर्भय भारत संस्थेच्या स्थापने वेळी केवळ चार सभासद होते. मात्र, दोन-चार वर्षांत संस्थेच्या रोपट्याचा आज वटवृक्ष झाला आहे. असंघटित कामगारांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिला जात असल्याने आज चुल आणि मुल या संकल्पने पलीकडे महिलांनी झेप घेतली असून त्या स्वावलंबी होत आहेत.
गट विकास अधिकारी संतोष हराळे यांनी संस्थेला शासकीय योजनांची माहिती आणि लाभ मिळवून देण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संजय देवकर यांनी केले. वसंत मोरे यांनी आभार मानले. कार्यक्रमात 35 विधवा महिला कष्टकरी सभासदांना मान्यवरांचे हस्ते साडीचोळी भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)