एकीकडे शिवस्मारकाच्या निविदांना आक्षेप तर दुसरीकडे शुभारंभ : धनंजय मुंडे

अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या बहुचर्चित शिवस्मारकाचा शुभारंभ आज दुपारी ३ च्या दरम्यान झाला. एल अँड टी अर्थात लार्सेन आणि टुब्रो कंपनीकडून समुद्रातील शिवस्मारकाच्या कामाला आज सुरुवात झाली. शिवस्मारकाचे काम येत्या ३ वर्षात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून हे शिवस्मारक बांधण्यात येणार आहे.

मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी ट्विटरद्वारे शिवस्मारकाच्या शुभारंभाच्या कार्यक्रमावर आक्षेप नोंदवला आहे. ट्विटरद्वारे एका संदेशामध्ये त्यांनी लिहले आहे की, “एकीकडे शिवस्मारकाच्या निविदा प्रक्रियेवर आक्षेप नोंदवायचा आणि दुसरीकडे शुभारंभाच्या कार्यक्रमासाठी अधिकारी पाठवायचे.”

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

धनंजय मुंडे यांनी आजच्या कार्यक्रमावेळी पत्रकारांना उन्हात उभे करत AC बोटीतून जाणाऱ्या पदाधिकाऱ्यांकडे देखील मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न ट्विटरद्वारे केला.

तत्पूर्वी राष्ट्रवादीचे जेष्ठ प्रवक्ते नवाब मलिक यांनी देखील शुभारंभाबाबत शंका उपस्थित करत ही लोकांची दिशाभूल असल्याचे म्हटले होते. शिवस्मारकासाठी स्मारकासाठी कोणतीही तांत्रिक परवानगी नाही. कंत्राटदार केवळ काम सुरू केल्याचे दाखवून लोकांच्या नजरेत धूळफेक करण्याचे काम सुरू आहे, असे देखील मलिक म्हणाले होते.

https://twitter.com/dhananjay_munde/status/1055051310339244033

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)