“एकीकडे युती तोडायच्या बाता मारायच्या आणि दुसरीकडे…” : विखे-पाटलांचा शिवसेनेवर घाणाघात

कोल्हापूर: एकीकडे युती तोडायच्या बाता मारायच्या आणि दुसरीकडे महामंडळाची अध्यक्षपदं स्वीकारायची असा दुटप्पी व्यवहार शिवसेनेतर्फे केला जात असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी शिवसेनेवर केला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की सत्ताधारी भाजपने रिक्त असलेल्या विविध महामंडळे व बोर्डांच्या २१ जागा भरण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे वारंवार होणाऱ्या वादांनंतर देखील भाजपाने मित्रपक्ष शिवसेनेला रिक्त जागांपैकी निम्म्याहून अधिक पदे बहाल केली आहेत. सतत युती तोडण्याची भाषा करणाऱ्या शिवसेनेने देखील ही पदे स्वीकारली आहेत.
याबाबत बोलताना विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी टीकेची झोड उठवली आहे. “शिवसेनेने वारंवार युती तोडण्याची भाषा केली आहे, परंतु महामंडळांची अध्यक्षपदे स्वीकारत शिवसेनेने आपले खरे रूप दाखवले आहे. शिवसेनेचे हे दुटप्पी धोरण म्हणजे राज्यातील जनतेचा विश्वासघात आहे.” अशी टीका त्यांनी केली.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
1 :cry:
1 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)