एकीकडे प्रबोधन दुसरीकडे कारवाई

सातारा : प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी बाबासाहेब कुकडे व नगरपरिषदेचे आरोग्य निरीक्षक व कर्मचारी.

सातारा, दि. 26 (प्रतिनिधी) – प्लॅस्टिक आणि थर्माकोल मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी जनजागृती अभियान पुन्हा एकदा जोमात सुरू असल्याचे सातारा शहरातील प्रमुख दुकानावर प्लॅस्टिक बंदीच्या दंडात्मक कारवाईने स्पष्ट झाले. यामध्ये शहरातील संजय रामराव कदम, होम केअर 53 रविवार पेठ यांच्यावर प्लॅस्टिक कव्हर असलेल्या पत्रावळ्या स्ट्रॉ विक्रीस ठेवल्याबद्दल रूपये 5 हजार, गणेश दोशी 37 पंताचा गोट यांनी प्लॅस्टिक गारबेज बॅग, प्लॅस्टिक पिशव्या, नॉन रिसायकलेबल, पिशव्या विक्री करताना 5 हजार रूपयांचा दंड, तर मोमीन अ‍ॅण्ड सन्स 51, रविवार पेठ यांच्यावर प्लॅस्टिक कप. प्लॅस्टिक कव्हर. पत्रावळ्या, प्लॅस्टिक गारबेज बॅग विक्रीस ठेवल्याप्रकरणाी दुसर्‍यांदा 10 हजार रूपयाची दंडात्मक कारवाई करण्यात आली. एकूण 40 किलो साठा जप्त केला. एकूण वीस हजार रूपयाच्या दंडाची सातारा प्रदूषण नियंत्रण मंडळ व नगरपरिषद सातारा यांनी संयुक्तिक कारवाई केली. यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी बाबासाहेब कुकडे, आरोग्य निरीक्षक कायगुडे, यादव, रणदिवे, टोपे, उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)