एका श्‍वानाच्या नसबंदीचा खर्च 693 रूपये

पिंपरी – महापालिकेकडून शहरातील भटक्‍या श्‍वानांवर नियंत्रण आणण्यासाठी त्यांच्यावर नसबंदी शस्त्रक्रिया करण्यात येते. त्यासाठी सध्या काम करीत असलेल्या 2 एजन्सींना 3 महिने मुदतवाढ देण्यात आली आहे. त्या कामासाठी एका नर किंवा मादीच्या शस्त्रक्रियेमागे महापालिका 693 रूपये मोजणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात मोकाट कुत्र्यांच्या त्रासाबाबत असंख्य तक्रारी आहेत. लहान मुले, रात्रीच्या वेळी कामावरुन घरी परतणारे कामगार, नोकरदार यांना कुत्र्यांनी चावा घेतला आहे. त्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची तीव्र मागणी आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन पालिका प्रशासनाने सध्या काम करीत असलेल्या दोन एजन्सींना मुदतवाढ दिली आहे.

-Ads-

मोकाट कुत्र्यांना पकडून आणून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करून, ते पुन्हा आहे त्या ठिकाणी सोडून देण्यासाठी सध्या उदगीर येथील सोसायटी फॉर दि प्रिव्हशन ऑफ क्रुएल्टी टू ऍनिमल्स आणि नवी मुंबईच्या ऍनिमल वेल्फेअर असोसिएशन या दोन एजन्सी काम करीत आहेत. या एजन्सीची मुदत 14 नोव्हेंबर 2018 ला संपली आहे. त्याना 15 नोव्हेंबरपासून पुढील 3 महिन्यांच्या कालावधीसाठी काम करण्यास प्रशासनाने मान्यता दिली असून, त्या दृष्टीने कामही सुरू करण्यात आले आहे. प्रति नर किंवा मादी कुत्र्यांवर शस्त्रक्रिया करण्यासाठी पूर्वीप्रमाणे 693 रूपये दर मंजूर केला आहे. या खर्चास मान्यता देण्याचा प्रस्ताव येत्या गुरूवारी (दि.22) होणाऱ्या स्थायी समिती सभेपुढे ठेवण्यात आला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)