एका रात्रीत दोन मंदिरांत चोरी

पिंपरी – पिंपळे गुरव येथे गुरुवारी (दि.20) रात्री दोन मंदिरात घरफोडी करण्यात आली असून याद्वारे मंदिरातील सुमारे 41 हजार 700 रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. याप्रकरणी सांगवी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

अक्षय अनिल साळवे (वय-23, रा. लक्ष्मीनगर, पिंपळे गुरव) असे अटक आरोपीचे नाव आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळे गुरव येथील प्रसिद्ध तुळजाभवानी मंदिर येथे अक्षयने चोरी केली. यामध्ये त्याने मंदिरातील पितळी दिवा, चार पितळी समई व मंदिरातील 10 हजार रुपयांचा एलईडी टीव्ही असा 22 हजार 700 रुपयांचा ऐवज चोरला. याप्रकरणी स्वप्नील श्रीकांत कदम (वय-26) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरु केला व त्यानुसार आरोपीला पिंपळे गुरव परिसरातून शुक्रवारी (दि. 21) अटक केली. तर काही दिवसांपूर्वी वाकड येथील एका मंदिरातून एक अल्पवयीन मुलगा मंदिरातील पितळेची घंटा चोरून नेताना निदर्शनास आला होता. त्याचे सीसीटीव्ही फुटेज “व्हायरल’ झाले होते.

गुरुवारी रात्रीच पिंपळे गुरव येथील स्मशानभूमी येथील कान्होबा मंदिरातही चोरी झाल्याची तक्रार मंदिराचे पुजारी सूर्यकांत ज्ञानोबा देवकर (वय-60) यांनी सागवी पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार देवकर हे शुक्रवारी सकाळी मंदिर उघडण्यास गेले असता त्यांना मंदिराचा लोखंडी दरवाजाची कडी तोडून मंदिरातील पितळी भांडी, दिवा, मूर्ती तसेच दोन पेटीतील रोख रक्कम असा 19 हजाराचा माल अज्ञात चोरट्याने चोरून नेला. पोलिसांनी याप्रकरणाचा हा तपास हाती घेतला असून मंदिरामध्ये चोरी करणाऱी टोळी तर परिसरात सक्रीय नाही ना याचा तपास सुरु केला आहे.

या आधीही भोसरी व बाणेर येथे अज्ञात चोरट्‌यांनी मंदिरात दरोडा टाकत दान पेटीतील हजारो रुपये चोरले होते. त्यामुळे शहर परिसरात केवळ घरे, एटीएम असुरक्षित झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला असून मंदिराच्या गाभाऱ्यात तसेच परिसरातही सीसीटीव्ही लावण्याचे आवाहन केले आहे. जेणे करून चोरी करणारे आरोपी कॅमेऱ्यामध्ये कैद होतील व तपास जलद गतीने होईल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)