एका रात्रीत दोन कापड दुकानांत चोरी

पिंपरी – एका रात्रीत एकाच परिसरातील दोन कापड दुकानांची शटर उचकटून चोरीची घटना घडली. यामध्ये 18 हजार 500 रुपये रोख व तसेच दोन शर्ट व एक जॅकेट चोरीला गेले आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 24) रात्री नऊ ते शनिवारी (दि. 25) सकाळी सात वाजण्याच्या दरम्यान लिंकरोड चिंचवड येथे घडली.

अर्चना राहुल इनामदार (रा. लिंकरोड, चिंचवड) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इनामदार यांचे चिंचवड मधील लिंकरोड येथे सुक्‍स हे कापडविक्रीचे दुकान आहे. शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास इनामदार यांनी दुकान बंद केले. रात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून दुकानातील गल्ल्यात ठेवलेली 17 हजार रुपये रोख रक्कम चोरली. इनामदार यांच्या शेजारी जोसेफ रॉड्रिग्ज यांचे ब्रॅंड बास्केट हेदेखील कपड्यांचे दुकान आहे. या दुकानातून चोरट्यांनी दोन शर्ट आणि एक जॅकेट चोरून नेले. चोरट्यांनी एकाच रात्री दोन दुकानात चोरी करून एकूण 18 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)