एका रात्रीत आठ घरफोड्या

पिंपरी – सांगवी व पिंपळे गुरव परिसरात शुक्रवारी (दि. 16) चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून एकात रात्री आठ घरफोड्या केल्या आहेत. त्यामुळे परिसरात सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

याप्रकरणी राजेंद्र निवृत्ती भगत (वय-45, रा. कवडेनगर पिंपळे गुरव) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-Ads-

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवी सांगवी व पिंपळे गुरव येथील कवडेनगर, सुयोग सोसायटी, किर्ती सोसायटी येथील आठ घरे फोडून दागिने रोकड असा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. सुमारे सव्वा तीन लाखांचा हा मुद्देमाल आहे. हा सारा प्रकार पहाटे दीड ते अडीचच्या दरम्यान घडला. सकाळी उठल्यानंतर चोरी झाल्याचे लक्षात येताच नागरिकांनी पोलिसांकडे धाव घेतली.

अद्याप शाळा सुरु न झाल्याने बहुसंख्य घरे बंद आहेत. त्याचाच फायदा घेत चोरांनी हात साफ करायला सुरुवात केली आहे. दरम्यान, वाकड पोलिसांनी सोसायट्यांना रात्रीच्या वेळी अचानक भेट देऊन सुरक्षा रक्षक झोपेतच ड्युटी बजावत असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. तरीही अनेक सोसायटींनी याकडे दुर्लक्ष केले. तर दुसऱ्या बाजूला पोलीस गस्तीवर नसतात का असा सवाल देखील नागरिकांनी उपस्थित केला आहे. नागरिकांनी गावी जाताना किंमती ऐवज बॅंकेत ठेवावा अथवा सोबत घेऊन जावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)