एका अाठवड्यात स्वाईन फ्लूचे 50 रुग्ण

आकडा शंभरी पार : “त्या’ 13 जणांचा मृत्यू?

पुणे – स्वाईन फ्लूची तीव्रता दिवसेंदिवस भयानक होत असून सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पन्नास रुग्ण बाधित असल्याचे आढळले आहे. आता एकूण रुग्ण संख्या 107 वर गेली आहे. तर, शहरात आणखी तेरा जण दगावल्याची शक्‍यता आहे. त्यामुळेच यंदा गणेशोत्सवावर स्वाईन फ्लूचे सावट निर्माण झाले आहे.

पालिका आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार जानेवारी महिन्यापासून आतापर्यंत स्वाईन फ्लूचे 107 रुग्ण आढळले असून त्यापैकी 45 जणांना उपचारांती घरी सोडले आहे. मात्र, 45 रुग्ण हे अद्यापही उपचार घेत आहेत. त्यापैकी 3 रुग्ण दगावले असून अन्य 13 रुग्णांबाबत नेमके काय झाले हे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले नाही.

याबाबत सहायक आरोग्य अधिकारी डॉ. अंजली साबणे म्हणाल्या, 13 रुग्णांबाबत आताच माहिती जाहीर केली जाणार नाही. दरम्यान, या 13 रुग्णांचा मृत्यू झाल्याची शक्‍यता आहे. आता पालिकेने याबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती मोहीम हाती घेतली असून मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या आहेत.

 

स्वाईन फ्लूची लक्षणे
– ताप, घसादुखी, घशाला खवखव, खोकला, नाक गळणे, अंगदुखी, डोकेदुखी

संसर्ग टाळण्यासाठी, अशी घ्या काळजी
– वारंवार साबण व स्वच्छ पाण्याने हात धुणे
– लिंबू, आवळा, मोसंबी, संत्री, हिरव्या पालेभाज्यांचा आहारात समावेश असावा
– शिंकताना, खोकताना नाकावर रुमाल लावा
– वापरलेल्या टिश्‍यू पेपरची कचराकुंडीत व्यवस्थित विल्हेवाट लावा, इतरत्र टाकू नका
– हस्तांदोलन टाळा
– सार्वजनिक ठिकाणी थंकू नका
– डॉक्‍टरांच्या सल्ल्याशिवाय औषध घेऊ नका
– फ्लू सदृश्‍य लक्षणे असल्यास गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा

कोणी अधिक काळजी घ्यावी
– मधुमेह, उच्च रक्‍तदाब, हृदयरोग अथवा जुनाट आजार असणाऱ्या व्यक्‍तींनी तसेच गरोदर महिलांनी अधिक काळजी घ्या.
– पाच वर्षांखालील विशेष करून एक वर्षाखालील बालकांची काळजी घ्या


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)