एकाही ‘संन्याशाला’ भारतरत्न देण्यात आला नाही : बाबा रामदेव

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाजप सरकारने माजी राष्टपती प्रणव मुखर्जी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर केला आहे.याशिवाय भारतीय जनसंघाचे नेते नानाजी देशमुख आणि ज्येष्ठ संगीतकार भूपेन हजारीका यांचाही भारतरत्न पुरस्काराने मरणोत्तर सन्मान करण्यात आला आहे. मात्र या यादीत केंद्र सरकारने एकाही ‘संन्याशाला’ भारतरत्न देण्यात आला नाही याबद्दल योगगुरु बाबा रामदेव यांनी खंत व्यक्त केली आहे. स्वातंत्र्यानंतर एकाही संन्याशाला देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेला भारतरत्न देण्यात आला नाही ही दुर्दैवी बाब असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. तसेच महर्षी दयानंद सरस्वती, स्वामी विवेकानंदजी किंवा शिवकुमार स्वामीजी यांच्यापैकी एकाला तरी पुढच्या वेळी भारतरत्न देण्यात यावा अशी रामदेव यांनी सरकारला विनंती केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)