एकाही मंत्र्याने काम केले नाही…

आमदार बाळू धानोरकर यांचा शिवसेनेला घरचा आहेर
नागपूर – शिवसेनेच्या मंत्र्यांच्या मतदारसंघात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका युती करुन लढल्या जातात, हा केविलवाणा प्रकार आहे. मंत्री केलेल्या कामाचे साधे पत्र आमदाराला देत नाहीत. शिवसेनेच्या 12 पैकी एका मंत्र्यांचे जरी काम असेल तर मी आमदारकीचा राजीनामा देईन, असे म्हणत वरोरा-भद्रावती मतदारसंघाचे आमदार बाळू धानोरकर यांनी शिवसेनेला घरचा आहेर दिला.

नागपूरमध्ये आयोजित पूर्व विभागीय मेळाव्यात ते बोलत होते. बाळू धानोरकर म्हणाले, पूर्व विदर्भाच्या कार्यकर्त्यांना शिवसेनेच्या मंत्र्यांकडून वाईट वागणूक दिली जाते. एकाही कार्यकर्त्यांचे समाधान झाले नाही, मंत्री कुठलंच काम करत नाही, एक मेळावाही घेत नाहीत. या मंत्र्यांच्या काळात शिवसेना खाली गेली. भद्रावती नगरपरिषद निवडणुकीत एकही मंत्री प्रचाराला आला नाही. ही शिवसैनिकांची फसवणूक आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे.

शिवसेनेच्या मंत्र्यांवर टीका करताना बाळू धानोरकर म्हणाले की, “मंत्र्यांनी जिल्हात सोडाच पण त्यांच्या मतदारक्षेत्रातही काम केलेले नाही. शिवसेनेच्या 12 पैकी एका मंत्र्यांचे जरी काम असेल तर मी आमदारकीचा राजीनामा देईन. शिवसेनेच्या मंत्र्यांचा महाराष्ट्राला काही फायदा आहे का याचा विचार करा, असा टोलाही त्यांनी लगाविला.

याशिवाय शिवसेनेचे मंत्री भाजप मंत्र्यांसोबत संधान बांधून आहेत. शिवसेना आता सत्तेतून बाहेर पडली तरच आपण 288 आमदारकीच्या आणि 48 खासदारकीच्या जागा लढवू शकू आणि भगवा फडकवू शकू, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)