वडूज, दि. 5 (प्रतिनिधी) – येथील न्यायालयामध्ये दाखल असलेल्या मारहाणीच्या दोन विविध खटल्यामध्ये प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. एन. पाठक यांनी दोन आरोपीपैकी एकास सक्तमजुरी व दंड तर दुसऱ्या खटल्यातील आरोपीस दंडाची शिक्षा ठोठावली.
खटाव, ता. खटाव येथील विश्वास नाना कोकाटे याने दि. 15 नोव्हेंबर 2016 रोजी त्याचा सख्खा भाऊ कैलास कोकाटे याला स्वच्छतागृहाच्या सांडपाण्याच्या कारणावरून चिडून जाऊन लोखंडी गजाने मारहाण केली होती. न्यायालयाने साक्षीपुरावा ग्राह्य मानून या मारहाणीच्या गुन्ह्याकरिता दोषी धरून आरोपीस तीन महिने सक्तमजुरी व 1 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.
तसेच दुसऱ्या खटल्यामध्ये नागाचे कुमठे, ता. खटाव येथील आप्पा मच्छिंद्र मांडवे यास सामाईक रस्त्याच्या मोजणीच्या कारणावरून त्याच गावातील लक्ष्मण रजपूत व इतर लोकांना किरकोळ मारहाण केल्याच्या गुन्ह्यामध्ये न्यायालयाने दोषी धरून 1 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.
या खटल्यामध्ये अभियोग पक्षातर्फे रमेश विश्वासनाथ साळुंखे व अभिजित अशोक गोपलकर यांनी कामकाज पाहिले. खटल्यातील साक्षीदारांची साक्ष, सरकारी अभियोक्‍त्यांचा युक्तिवाद व पुरावा ग्राह्य मानून न्यायालयाने आरोपींस दोषी धरून वरील आरोपींना शिक्षा ठोठावली. सदरकामी अभियोग पक्षास पोलीस प्रॉसिक्‍यूशन स्कॉडचे तौसिफ शेख, सहा. फौ. शिवाजी पायमल, प्रदीप गोसावी, सुधीर मोहिते, पो. हवा. विलास हांगे यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)