एकादशीनमित्त बटाट्याची मोठी आवक

पिंपरी- मोशीतील नागेश्‍वर महाराज उपबाजारात फळभाज्यांची आवक वाढली असून, पालेभाज्यांची आवक मात्र घटली आहे. फळभाज्यांमध्ये आले, मटार, वांगी आणि ढोबळीची आवक घटली असून, पालेभाज्यांमध्ये कोथिंबीर आणि मेथीची आवक घटली आहे. फळभाज्यांची एकूण आवक एक हजार 157 क्विंटल झाली असून, पालेभाज्यांची आवक 16 हजार 360 गडड्या एवढी झाली आहे. फळभाज्यांची आवक 305 क्विंटलने वाढली आहे; तर पालेभाज्यांची आवक नऊ हजार 130 गडड्यांनी घटली आहे.

कांद्याची आवक 159 क्विंटलने वाढून, भाव मात्र स्थिर राहिले. बटाट्याची 156 क्विंटल आवक झाली असून, गेल्या आठवड्याच्या तुलनेत 127 क्विंटलची वाढ झाली आहे; तर भावमात्र स्थिर राहिले. भेंडीची आवक आठ क्विंटलने घटून भावात 1500 रुपयांची वाढ झाली.

-Ads-

गवारीची आवक सात क्विंटलने वाढून, भाव मात्र 750 रुपयांनी वधारले. तसेच टोमॅटोची 36 क्विंटल आवक वाढून भाव मात्र स्थिर राहिले. मटारची आवक 58 क्विंटलने घटून, भाव 750 रुपयांनी घटले. घेवड्याची आवक पाच क्विंटलने वाढून भाव 500 रुपयांनी घसरला. दोडक्‍याची आवक दोन क्विंटलने घटून, भावात 500 रुपयांची वाढ झाली. लसणाची आवक 55 क्विंटलने वाढून, भाव मात्र स्थिर राहिले. आल्याची आवक एक क्विंटलने घटून, भावात 250 रुपयांची घट झाली. मिरचीची आवक सहा क्विंटलने वाढून, भाव 250 रुपयांनी वधारले. तसेच दुधी भोपळ्याची आवक सात क्विंटलने घटून, भाव 450 रुपयांनी वधारले.

कारल्याची आवक स्थिर राहून क्विंटलने घटून, भाव 150 रूपयांनी रुपयांनी घटले. गाजराची आवक 21 किंटलने वाढून, भाव मात्र स्थिर राहिले. फ्लॉवरची आवक 28 क्विंटलने घटून भाव स्थिर राहिले. कोबीची आवक 17 क्विंटलने वाढून भाव मात्र स्थिर राहिले. वांग्याची आवक आठ क्विंटलने घटूनही भावात मात्र 250 रुपयांची वाढ झाली. लिंबाची आवक चार क्विंटलने वाढूनही सलग दुसऱ्या आठवड्यात भाव स्थिर राहिले. काकडीची आवक 16 क्विंटलने घटून, भाव 100 रुपयांनी वधारले. कैरीची एक क्विंटल आवक वाढून, भाव 1500रुपयानी घटले.

शेवग्याची आवक पाच क्विंटलने घटून, भाव मात्र स्थिर राहिले. ढोबळी मिरचीची आवक सात क्विंटलने घटून, भाव 250 रुपयांनी वधारले. तोंडल्यांची आवक एक क्विंटलने घटून, भाव मात्र स्थिर राहिले. बीटची आवक दोन क्विंटलने घटून, भाव स्थिर राहिले. पावट्याची आवक दोन क्विंटलने वाढून, भाव 500 रुपयांनी वधारले. याशिवाय चवळीची आवक दोन क्विंटलने घटून, भाव 500 रुपयांनी घटले. पापडीची आवक पाच क्विंटलने वाढून, भाव 500 रुपयांनी घसरले. रताळ्याची आवक दोन क्विंटलने वाढून, भाव 1250 रुपयांनी वधारले.

पालेभाज्यांमध्ये कोथिंबीरीच्या पाच हजार 650 गड्ड्यांची आवक झाली. तर मेथीची पाच हजार 350 गड्ड्या आवक झाली आहे. याशिवाय मुळे 570 गड्ड्या, पुदीना 300 गडड्या, पालक दोन हजार 560 गड्ड्या, कांदापातीच्या एक हजार 700 गडड्या, करडईच्या 80 गडड्‌यांची आवक झाली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)