एकाच वेळी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका घेण्यास मार्क्‍सवाद्यांचा विरोध

हैदराबाद – देशात एकाचवेळी लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुका घेऊन निवडणुकांवरील खर्च टाळण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरू आहे. तथापी या प्रस्तावाला मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाने विरोध दर्शवला आहे.

विधानसभा निवडणुकांच्या निमीत्ताने त्या त्या राज्यातील प्रश्‍नांसंबंधात चर्चा होत असते. तथापी लोकसभेबरोबर विधानसभेची निवडणूक घेतल्यास राज्यातील प्रश्‍न दुर्लक्षित राहण्याची शक्‍यता असल्याने अशी निवडणूक घेण्याची प्रथा घातक ठरेल असा त्यांचा आक्षेप आहे.

सन 2024 सालापासून लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुका एकत्र घेण्याचा प्रयत्न आहे पण या प्रस्तावाला आमचा सक्त विरोध आहे असे मार्क्‍सवादी पक्षाच्या पॉलिट ब्युरोच्या सदस्या वृंदा कारत यांनी पीटीआयला सांगितले. तत्कालिन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या निवडणुका एकत्र घेण्याचा आग्रह धरला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)