एकाच विचारसरणीवर देश चालू शकत नाही – राहुल गांधी

नवी दिल्ली – आपल्यावर एकच विशिष्ट विचारसरणी लादली जात असल्याची भावना देशातील अनेकांमध्ये निर्माण झाली आहे. अशा पद्धतीने एकाच विचारसरणीवर देश चालू शकत नाही असे प्रतिपादन कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केले आहे. लोकांना विविध संकल्पना, किंवा विचारसरणीवर चर्चा करण्यास अनुमती दिली गेली पाहिजे. त्यांच्यावर या प्रक्रियेत निर्बंध घालून उपयोग होणार नाही असे राहुल म्हणाले.

देशातील शैक्षणिक क्षेत्रातील प्रमुख व्यक्तींच्या एका बैठकीत बोलताना राहुल गांधी यांनी या सरकारच्या शैक्षणिक धोरणावरही टीका केली. ते म्हणाले की सरकारने सरकारी शैक्षणिक संस्थांना महत्व दिले पाहिजे पण प्रत्यक्षात सरकारने खासगी शैक्षणिक संस्थांच्या हितासाठी सरकारी शैक्षणिक संस्थांच्या हिताचा बळी दिला आहे.

सरकारी शैक्षणिक संस्थांच देशाचा दीपस्तंभ असतात आणि असल्या पाहिजेत. त्यासाठी सरकारने सरकारी शिक्षण संस्थांमध्ये पैशाची पुरेशी गुंतवणूक केली पाहिजे. पण या सरकारने खासगी शैक्षणिक संस्थांनाच अधिक वाव देऊन चुकीचे धोरण राबवले असे ते म्हणाले. लोकांना बोलू दिले पाहिजे त्यांना त्यांचे विचार मुक्तपणे मांडू दिले पाहिजेत. एकच विचार त्यांच्यावर थोपवून चालणार नाही. आपल्या देशाचा तीन हजार वर्षांचा इतिहासही आपल्याला याची ग्वाही देतो असे ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)