एकाच पाण्याच्या टाकीवर “स्मार्ट प्रभागा’ची भिस्त

पिंपरी – स्मार्ट सिटी योजनेत समावेश झालेल्या पिंपळे सौदागर प्रभागाला एकाच पाण्याच्या टाकीवरुन पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे विस्कळीत पाणी पुरवठ्याचा सामना प्रभागातील रहिवाशांना करावा लागत आहे. पिंपळे सौदागरसाठी दोन नवीन पाण्याच्या टाक्‍याही मंजूर करण्यात आल्या आहेत. पाण्याची टाकीसाठी पाईप व अन्य साहित्य येवूनही टाकीचे काम अद्याप सुरू झाले नाही. त्यामुळे यंदाचा उन्हाळाही पिंपळे-सौदागरवासियांसाठी त्रासदायक ठरणार आहे.

स्थानिक नगरसेविका शितल काटे यांनी महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देत या समस्येकडे लक्ष वेधले आहे. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 28 असलेल्या पिंपळे सौदागर येथे सध्या गावठाणातील एकाच पाण्याच्या टाकीवरून पाणी पुरवठा केला जातो. त्यामुळे येथील नागरिकांना पाणी योग्य प्रमाणात मिळत नाही. आता रहाटणी, पिंपळे सौदागर हा भाग “स्मार्ट सिटी’ या योजनेत समाविष्ट झाला आहे. असे असतानाही अद्याप या भागात पाण्याचे योग्य नियोजन झालेले नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दिवाळीपासूनच या भागातील पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. महापालिकेने शहरातील पाणी कपातीचे नियोजन केले आहे. त्यामुळे पिंपळे सौदागरची पाणी समस्या अधिक तीव्र होण्याची शक्‍यता आहे. वर्षभरापूर्वी पिंपळे सौदागरसाठी दोन पाण्याच्या टाक्‍या मंजूर करण्यात आल्या. या टाकीसाठी अमृत योजनेअंतर्गत साहित्य येवूनही मात्र अद्याप कामाला सुरूवात झाली नाही. टाकीचे काम सुरु करण्यासाठी पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता रामदास तांबे यांच्याकडे लेखी व तोंडी तक्रार करून सुद्धा ते या तक्रारीकडे दुर्लक्ष करीत आहेत. यात कुणाचा स्वार्थ लपलाय का, असा सवालही नगरसेविका शितल काटे यांनी केला आहे. पाणी पुरवठा सारख्या मुलभूत प्रश्‍नाकडे कानाडोळा करणाऱ्या तांबे यांची बदली करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

पिंपळे सौदागरमध्ये वीस गुंठे जागेत पाण्याची टाकी उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे. अमृत योजनेतून या टाकीचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी पाईपसह काही साहित्य देखील याठिकाणी टाकण्यात आले आहे. मात्र, जाणिवपूर्वक टाकीच्या कामास विलंब केला जात आहे. निवडणूक जवळ आली की टाकीचे काम हातात घेवून श्रेय लाटण्याचा सत्ताधाऱ्यांचा खटाटोप सुरू आहे. त्याचा फटका पाणी सारख्या मुलभूत सुविधेला बसत आहे.
– शितल काटे, नगरसेविका, राष्ट्रवादी कॉंग्रेस.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)