एकाच दिवशी सात सराईत तडीपार

पिंपरी – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय परिमंडळ एकच्या हद्दीतील पिंपरी, चिंचवड, निगडी आणि भोसरी पोलीस ठाण्यातील सात सराईत गुन्हेगारांना दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. ही कारवाई बुधवारी (दि. 30) करण्यात आली आहे. एकाच दिवशी सात गुन्हेगारांना तडीपार केल्याने गुन्हेगारी वर्तुळाचे धाबे दणाणले आहेत.

सुरेश उर्फ चिम्या शांताराम निकाळजे (वय-42, रा. आदर्शनगर, पिंपरी), चंद्रकांत अनंत माने (वय-26, रा. वेताळनगर झोपडपट्टी, चिंचवडगाव), सुदर्शन उर्फ पिन्या संभाजी राक्षे (वय-22, रा. रामनगर कॉलनी, शास्त्री चौक, आळंदी रोड, भोसरी), सोमनाथ उर्फ तम्मा हनुमंत लष्करे (वय-21, रा. राजनगर, ओटास्कीम, निगडी), निलेश भाऊसाहेब कोळपे (वय-31, रा. शिवाजी चौक, वाल्हेकरवाडी, चिंचवड), गणेश राजू चोरघे (वय-29, रा. पाईट, चोरघेवाडी, ता. खेड), सोमनाथ नथू शिनगारे (वय-26, रा. पाईट, चोरघेवाडी, ता. खेड) या सात आरोपींना पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शहरात शांतता रहावी यासाठी पोलीस शहरात जे सराईत गुन्हेगार आहेत त्यांच्यावर नजर ठेऊन आहेत. त्याच पार्श्‍वभूमीवर ही कारवाई केली गेल्याचेही बोलले जात आहे. या आरोपींवर दरोडा, घरफोडी, चोरी, खून, मारामारी असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

या कारवाईसाठी ऑगस्टपासून आमची तयारी सुरू आहे. आयुक्‍तालयाच्या स्थापनेपासून आत्तापर्यंत सुमारे 25 जणांना तडीपार केले आहे. तसेच यापुढेही अजून बरेच गुन्हेगार आहेत ज्यांच्यावर आम्ही तडीपारीची कारवाई करणार आहोत.
– स्मार्थना पाटील, पोलीस उपायुक्‍त, परिमंडळ एक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)