एकाच दिवशी ज्वेलर्सची दोन दुकाने फोडली

पिंपरी – ज्वेलर्सचे दुकाने फोडल्याच्या घटना मंगळवारी (दि. 29) सकाळी उघडकीस आल्या. यामध्ये निगडी येथील दुकानातून 17 तोळे सोने, 50 किलो चांदी चोरट्यांनी लंपास केली. तर नेहरुनगर येथे सेंट्रल लॉक तोडून दुकानातील दीड किलोची चांदी चोरून नेली.

निगडीतील घटनेप्रकरणी राकेश सुकनराज मंडेशा-जैन (वय-38, रा. निगडी, गावठाण) यांनी फिर्याद दिली. राकेश यांचे निगडी गावठाण येथे सुमंगलम ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. सोमवारी रात्री त्यांनी दुकान कुलूप लावून बंद केले. रात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून दुकानातील सर्व दागिने चोरून नेले. यामध्ये 17 तोळे सोने आणि 50 किलो चांदीचे दागिने होते. सकाळी राकेश दुकान उघडण्यासाठी आले असता हा प्रकार उघडकीस आला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नेहरूनगर येथे पहाटे तीनच्या सुमारास ममता ज्वेलसचे सेंट्रल लॉक तोडून दुकानातील दीड किलोची चांदी चोरून नेली आहे. याप्रकरणी भीमसिंग भवरसिंग धसद यांनी फिर्याद दिली आहे. चोरट्यांनी दुकानातील तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र ती त्यांना उघडता न आल्याने त्यांना सोने चोरता आले नाही. चोरट्यांनी सीसीटीव्हीचा डीव्हीआरही चोरून नेला. पुढील तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)