एकाच कुटुंबातील 11 जणांचा गुजरातमध्ये अपघाती मृत्यू

मुंबई – गुजरातमधल्या धंधुका-बरवाडा महामार्गावरच्या एका भीषण अपघातात एकाच कुटुंबातील अकरा जणांचा मृत्यू झाला आहे. डोंबिवलीतल्या शहा परिवारातले हे कुटुंबीय आहेत. यात 5 महिला आणि 6 पुरुषांचा समावेश आहे. अपघातात 14 वर्षांचा एक मुलगा वाचला आहे. जीप आणि ट्रकमध्ये ही भीषण धडक झाली.

डोंबिवलीच्या संगितावाडीमधील गोविंद धाम सोसायटीतील हितेश शहा त्यांच्या कुटुंबीयांसह गुजरातला जीपने देवदर्शनाला गेले होते. ते जीपने भावनगर येथील पालिताना मंदिरात दर्शनाला जात होते. यावेळी धुका-बरवाला रस्त्यावर अचानक जीपच्या समोर ट्रक आल्याने ट्रक आणि जीपची जोरदार धडक झाली आणि या धडकेत जीपमधील 11 जणांचा मृत्यू झाला. मात्र हितेन शहा यांची 80 वर्षाची आई या अपघातातून आश्‍चर्यकारकरित्या बचावल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)