एकाच अधिकाऱ्याकडे दोन वेगळे विभाग कसे?

ही “बक्षिसी’ कोणासाठी? महापालिकेतील विरोधी पक्षाचा सवाल

पुणे – एका खात्यात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना दुसऱ्या खात्यातील पदभार दिला गेला असून, ही “बक्षिसी’ कोणासाठी असा सवाल महापालिकेतील कॉंग्रेस गटनेते अरविंद शिंदे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आणि महापालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी उपस्थित केला आहे. तसे पत्रही त्यांनी महापालिका आयुक्तांना दिले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महापालिकेतील अभियंत्यांच्या नुकत्याच बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यातील काही अधिकाऱ्यांच्या बदल्या तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला नसल्याचे स्पष्ट आहे.

या अभियंत्यांच्या वेतनाचा तपशील पाहिला असता, त्यांचे वेतन एका खात्यातून होते मात्र त्यांच्याकडे दुसऱ्याच खात्यातील पदभार दिलेला असतो आणि ते त्या ठिकाणी काम करत असतात. वास्तविक त्याच खात्यातील व्यक्तीला अतिरिक्त पदभार देणे आवश्‍यक असते, तसे न करता थेट दुसऱ्याच खात्यातील व्यक्तीला हा पदभार कसा काय दिला असा प्रश्‍नही शिंदे आणि तुपे यांनी विचारला आहे.

एवढेच नव्हे तर बांधकाम विभाग, पथ विभाग याच खात्यातील अतिरिक्त पदभार दिले गेल्याचेही निदर्शनाला आले असून, महापालिकेतील पदाधिकारी आणि नगरसेवकांना खूष करण्यासाठी अशा मोजक्‍याच अभियंत्यांना असे अतिरिक्त पदभार दिले गेल्याचा आरोपही शिंदे आणि तुपे यांनी केला आहे.

अभियंत्यांना अशी बक्षिसी का दिली, याबद्दल उत्सुकता असून असे दुसऱ्या खात्याचे अतिरिक्त पदभार दिलेल्या अभियंत्यांनी काम काय केले आहे, याचा तपशील आम्हाला द्यावा; म्हणजे त्यांनी शहरासाठी केलेले काम जनतेसमोर येईल, असा खुलासाही शिंदे आणि तुपे यांनी आयुक्तांकडे मागितला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)